Uncategorized

बोईसर पश्चिम येथे शिवमहापुराण कथा व खाटू श्याम भजनसंध्येचे भव्य आयोजन

बोईसर पश्चिम येथे शिवमहापुराण कथा व खाटू श्याम भजनसंध्येचे भव्य आयोजन
बोईसर (पालघर) :
राष्ट्रीय हिंदू सेवा संघ, पालघर जिल्ह्याच्या वतीने शिवमहापुराण कथा तसेच श्री खाटू श्याम व गौमाता यांच्या नामाने भजनसंध्या यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम दि. ५ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज आयोजित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम चिल्ड्रन पार्क, गंगोत्री हॉटेलसमोर, बोईसर पश्चिम येथे संपन्न होणार आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शिवमहापुराण कथा होणार असून, सुप्रसिद्ध कथावाचक डॉ. नरेंद्र नाथ दास हे भाविकांना शिवपुराणातील दिव्य कथांचे श्रवण घडवणार आहेत.
तसेच दररोज रात्री १० वाजल्यापासून श्री खाटू श्यामजी यांची भजनसंध्या आयोजित करण्यात आली असून, प्रसिद्ध भजनगायक डॉ. ओम मुंडक आपल्या सुमधुर भजनांनी उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, शिवभक्त, खाटू श्याम भक्त तसेच गौमातेप्रती श्रद्धा असलेल्या सर्व भाविकांसाठी हा एक आध्यात्मिक सोहळा ठरणार आहे. राष्ट्रीय हिंदू सेवा संघ, पालघर जिल्ह्याच्या वतीने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button