Uncategorized

पालघर नगर परिषदेत राहुल प्रकाश पाटील यांचा विक्रमी विजय; राधा जितेंद्र पामाळे यांची सलग दुसऱ्यांदा निवड

पालघर नगर परिषदेत राहुल प्रकाश पाटील यांचा विक्रमी विजय; राधा जितेंद्र पामाळे यांची सलग दुसऱ्यांदा निवड
पालघर (प्रतिनिधी)पालघर नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी सर्वाधिक मतदान मिळवत राहुल प्रकाश पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून दणदणीत विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे पालघर नगर परिषदेत सर्वात उतुंग मताधिक्याने निवडून येणारे ते प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले होते, आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विक्रमी यश संपादन केले.
याच गटातून राधा जितेंद्र पामाळे (मानकामे) यांनी आपली सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकत पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवला आहे. त्यांच्या अनुभव व कार्यक्षमतेमुळे मतदारांनी त्यांना पुन्हा संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दोन्ही उमेदवारांच्या विजयामुळे पालघर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती देण्याचा संकल्प नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button