Uncategorized

रोह्यात ‘आजचा महाराष्ट्र टॉप १० न्यूज’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न!

रोह्यात ‘आजचा महाराष्ट्र टॉप १० न्यूज’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न!

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील )
रायगड -रोहा :- दि.२४ .‘आजचा महाराष्ट्र टॉप १० न्यूज’ या वृत्तपत्राचा पहिला वर्धापन दिन सोहळा दिनांक २२ मार्च २०२६ रोजी रोहा नगरपरिषद येथील जेष्ठ नागरिक सभागृहात सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला. यावेळी वृत्तपत्राच्या यशस्वी तीन वर्षांच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण १३ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये ११ ‘रायगड भूषण’ पुरस्कार, १ ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकार भूषण पुरस्कार’ आणि १ ‘समाज भूषण’ पुरस्काराचा समावेश आहे.
पुरस्कारार्थी मान्यवरांमध्ये
श्री.सुनीलजी तटकरे, डॉ.श्री.मनिलाल रातीलाल शिंपीरस्ता सुरक्षा अभियान विभागीय नोडल ऑफिसर (RSP) (समाज भूषण), डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील (बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकार भूषण पुरस्कार), ह.भ.प. ॲड. आकाश महाराज भोंडवे (वारकरी संप्रदाय), सौ.अर्चना पाटील (चित्रपट क्षेत्र), श्री. तुकाराम खेळू थिटे (शेतकरी), श्री. रामजी भागोजी कदम (गड संवर्धन), श्री. सागर दहिबेकर (आपत्ती व्यवस्थापन),श्री. योगेश कृष्णात सातपुते (युथ आयकॉन),श्री. सुखद सरिता राजाराम राणे (गड संवर्धन), मा. श्री. नरेंद्र सखाराम माळी (शिक्षण क्षेत्र) तसेच श्री समर्थ कृपा महिला बचत गट, आंबडोशी (स्वयंरोजगार क्षेत्र).यांचा समावेश आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम डॉ.श्री. मनिलाल रातीलाल शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाला
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नेहा नरेंद्र जाधव (जिल्हा परिषद सदस्य),श्री.संजय मांडलुसकर (उपसभापती, पंचायत समिती रोहा),डॉ. श्री .किशोर बळीराम पाटील (संपादक, दैनिक स्वराज तोरण),ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. जयपाल पाटील, श्री. जगन्नाथ धनावडे( पंचायत समिती सदस्य) ,ह.भ.प.ॲड.आकाश महाराज भोंडवे, संपादक ॲड.संतोष चव्हाण , संपादक.श्री.अफसर खान , जयप्रकाश पवार, डॉ. प्रतीक कुंडे, ब्रह्मकुमारी वैशाली दीदी अभिनेत्री सौ .अर्चना पाटील, श्री.संतोष पाटील आदी मान्यवर व मोठया संखेने जिल्ह्यातील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य तसेच रोहा तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकारांना ‘पत्रकार गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश जंगम स्वामी यांनी केले तर संपादक म्हणून श्री. प्रशांत गणपत मोरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “सत्य आणि निर्भीड पत्रकारितेच्या बळावर आम्ही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. अल्पावधीतच वाचकांचा विश्वास मिळवणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुढील काळातही सामाजिक बांधिलकी जपत, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवू.
.”आजचा महाराष्ट्र टॉप टेन न्युज च्या प्रथम वर्धापन दिनास माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा गेल्या तीन वर्षात संपादक प्रशांत मोरे व त्यांच्या संपूर्ण टीम ने आपल्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्याच प्रमाणे अन्याया विरोधात आपल्या लेखणीच्या जोरावर न डगमगता लेखणी करून अनेकांना न्याय मिळवून दिला अशाच प्रकारचे कार्य त्यांच्या हातून घडावे ह्याच माझ्याकडून सदिच्छा असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. मणिलाल शिंपी यांनी सागितले.याच प्रमाणे निधी जाधव, ॲड. संतोष चव्हाण, वैशाली दीदी, ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे पाटील, प्रा. डॉ. जयपाल पाटील, डॉ. किशोर पाटील, संजय मांडलुसकर आणि सुखद राणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संपादक प्रशांत मोरे व त्यांच्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनोज भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय वामन लोटणकर यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम सानप, विश्वास निकम, प्रदीप मोरे, महेश भोकटे यांनी विशेष मेहनत घेतली….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button