Uncategorized

पालघर जिल्हा पोलीसांचे सर्व जनतेला जाहीर आवाहन, अफवांपासून सावधान राहा 🚔

पालघर जिल्हा पोलीसांचे सर्व जनतेला जाहीर आवाहन, अफवांपासून सावधान राहा 🚔
२५ डिसेंबर
सफाळे ( एच लोखंंडे ) पालघर जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे “मुले पळवणारी टोळी परिसरात फिरत आहे” अशा प्रकारच्या अफवा सोशल मिडिया व तोंडी पसरविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
या अनुषंगाने सफाळे पोलिस ठाणे ता.जि.पालघरर, ठाणे प्रभारी पोलिस अधिकारी श्री दत्ता शेळके सपोंनी.यांनी नागरिकांनी खालील सूचना गांभीर्याने पाळाव्यात याबद्दल सुचना प्रसारित करीत आहेत.
१) अफवांवर विश्वास ठेवू नका WhatsApp, Facebook किंवा तोंडी ऐकलेल्या अपुष्ट व अप्रमाणित संदेशांना विश्वास ठेवू नका किंवा फॉरवर्ड करू नका.
२) माहितीची खातरजमा करा
कोणतीही संशयास्पद घटना किंवा माहिती असल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा 112 / 9923962304 या क्रमांकावर संपर्क साधावा.
३) कायदा हातात घेऊ नका
फक्त संशयावरून कोणालाही अडवणे, चौकशी करणे, मारहाण करणे किंवा जाब विचारणे कायद्याने गुन्हा आहे.
३) मुलांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घ्या. मुलांना एकटे बाहेर पाठवताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्तींसोबत जाण्यास किंवा बोलण्यास मनाई करा.
४) अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई तर खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
🚓🚔 पोलीस प्रशासन पूर्णतः सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
नागरिकांनी शांतता राखावी व कायदा व सुव्यवस्थासाठी पोलिसांना सहकार्य करावे.
— सफाळा पोलीस ठाणे, आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे
🙏 आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत.
📞 हेल्पलाईन : 112

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button