Uncategorized

जगदोध्दारक श्री.दत्तमंदिर, व्दारे ८२ वा “श्री दत्तजयंती उत्सव” संपन्न

जगदोध्दारक श्री.दत्तमंदिर, व्दारे ८२ वा “श्री दत्तजयंती उत्सव” संपन्न
५ डिसेंबर
सफाळे ( एच लोखंंडे ) दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी, श्रीमद् सद्गुरू जगदिश्वर स्वामी शिष्य संप्रदाय यांच्या कडून सालाबादप्रमाणे, जगदोध्दारक श्री दत्तमंदिर, श्रीक्षेत्र माकुणसार ता. जि.पालघरया ठिकणी “श्री दत्त जन्मोत्सव” मार्गशीर्ष शुद्ध १५ शके १९४७ – गुरूवार रोजी. मंदिराचे अध्यक्ष – श्री. प्रमोद ज.ठाकुर , चिटणीस – श्री.नितीन हे. राऊत आणि विश्वस्त मंडळ यांच्या सहयोगाने व संप्रदाय प्रसारक श्री.नारायण मंगळ्या पाटील – भजन / किर्तन व्यवस्थापक आणि ह.भ.प.श्री. विजयबुवा दळवी – पालघर, श्री.जगन्नाथ केशव ठाकूर, श्री.पिटाळे सर किर्तनकार सफाळे, श्री.रामदास जाधव तसेच श्रीमत् सद्गुरू जगदोध्दारक स्वामी शिष्य संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने वरील कार्यक्रम आयोजित करून यशस्वीपणे संपन्न करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्रीच्या मुर्तीला अभिषेक व आरती करून, श्रीमद् सद्गुरू जगदिश्वर स्वामी शिष्य संप्रदाय माकुणसार, यांच्या हरिपाठ व कार्यक्रमाने करण्यात येऊन,नंतर ह.भ.प. श्री.पिटळे सर सफाळे व रामदास जाधव यांचे प्रवर्चन झाले. प्रवर्चना नंतर व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित हस्ते/ उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, जेष्ठ नागरिक, यांचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष – श्री. मनोज रा.म्हात्रे तथा लायन्स क्लब सफाळे / माकुणसार अध्यक्ष, तसेच प्रमुख पाहुणे श्री.आशय ह. राऊत – चेअरमन वसई वि.स. बॅक लि. श्रीम. साधना रा. पाटील – अध्यक्षा यशविद्या निकेतन ग्लोबल स्कूल विरार, श्री.प्रकाश का.वर्तक – अध्यक्ष सेतू को.क्रेडिट सो.बोरीवली मुंबई, श्रीम. विमल प.म्हात्रे सेवानिवृत्त शिक्षका मुंबई ( हल्ली रा. रामबाग ) प्रमाणे पाहुणे / मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मध्यंतरी सौ.दक्षा व श्री दत्तात्रेय श.पाटील यांच्या सौजन्याने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले. महाप्रसादा नंतर, ह. भ. प. श्री दिपेश दांडेकर पालघर यांचे प्रवर्चन,व ह.भ.प.श्री. विजयबुवा ( नर्मदा परिक्रमा ) यांचे श्री दत्त जन्मोत्सवाचे सुश्राव्य किर्तन, संध्याकाळी श्रीची आरती, नंतर भव्यदिव्य पालखी मिरवणूक, आदी कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत सद्गुरू जगदिश्वर स्वामी शिष्य संप्रदाय यांच्या सह समस्या परिसरातील जनसमुदाय जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.पंकज अरूण म्हात्रे – माकुणसर ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केले तर सुत्र संचालन कार्यभार श्री नितीन यांनी नियोजन बद्ध रितीने सांभाळला. शेवटी श्री. भुपेश म्हात्रे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जगदोध्दारक श्री. दत्तमंदिर माकुणसार यांच्या कडून दरवर्षी विद्यार्थी दत्तक पालक योजना, परिसरातील शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासठी रोख रक्कम, पारितोषिके, महिला सबलीकरणासाठी प्रोत्साहन कार्यक्रम, प्रबोधनपर धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम आरोग्य शिबीरे वेळोवेळी आयोजित करून ते यशस्वीपणे राबवून घेतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button