Uncategorized

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय तलासरी येथील राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराची सुरुवात

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय तलासरी येथील राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराची सुरुवात

तलासरी (प्रतिनिधी)आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराची सुरुवात आशगड येथे दि. 24 डिसेंबर 2025 रोजी प्राचार्य बी.ए राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
​या सातदिवसीय निवासी शिबिराला आशगड चे सरपंच दिल्पेश दौडा, दीप अकॅडमी चे प्रमुख बापू बनकर, महाविद्यालयाचे प्राचार्य बी.ए राजपूत आणि मुख्याध्यापक किशोर चौरे यांची उद्घाटनप्रसंगी उपस्थिती लाभली.

​उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. ए राजपूत यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत त्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे अनुभव प्रदीर्घ प्राचार्यपद भुषवण्यासाठी कसे उपयुक्त झाले याचे महत्त्व विशद केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना मध्ये काय बदल घडवून आणेल याविषयी मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

दीप अकॅडमी चे प्रमुख बापू बनकर तसेच मुख्याध्यापक किशोर चौरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात कसे बदल झाले त्याबद्दल स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

हे शिबिर दि. 24 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत चालणार आहे.​ शिबिराच्या कालावधीत अशागड गावामध्ये स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती व दारूमुक्ती जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक प्रबोधन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सर्व मान्यवरांनी या शिबिरासाठी शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात शिबिराची सुरुवात झाल्याचे समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button