Uncategorized
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक कार्यातून, क्षेत्राबाहेरील महिला शिक्षिका व दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक यांना निवडणूक कामातून वगळावेश्री. केदार काळे शिवसेना प्रवक्ते

- वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक कार्यातून, क्षेत्राबाहेरील महिला शिक्षिका व दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक यांना निवडणूक कामातून वगळावे
- श्री. केदार काळे शिवसेना प्रवक्ते
२७ डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) मागील घेण्यात आलेल्या निवडणुकां प्रक्रिया मध्ये मतदान अधिकारी दोन व तीन या पदा करिता स्थानिक महानगरपालिका क्षेत्राबाहेरील इतर शहरातील महिला कर्मचाऱ्यांना व शिक्षिकेना सेवा मतदान अधिकारी पद दोन-तीन करिता अधिग्रहण करण्यात येत नव्हते.
मात्र मात्र 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकी करता. वसई विरार महानगरपालिका क्षेत्राबाहेरील, परंतु पालघर जिल्ह्यातील सफाळे, केळवा, पालघर, बोईसर, डहाणू व पालघर जिल्ह्यातील इतर भागातील अनेक महिला शिक्षकांना सेवा मतदान अधिकारी पद दोन व तीन करिता अधिग्रहित करण्यात आले आहे .
यामुळे पालघर, बोईसर डहाणू, सफाळे, केळवा या भागातील महिला कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपापल्या केंद्रावर पोहोचणे खूप कठीण जिकिरीचे होणार आहे.
या अनुषंगाने सदर महिला शिक्षकांना उद्भवणाऱ्या समस्येचा वस्तुनिष्ठपणे विचार करून या महिला शिक्षकांना सेवा अधिग्रहित न करता आपल्या वसई – विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित कराव्यात. अशी विनंती मागणी पत्राद्वारे श्री. केदार काळे – शिवसेनेचे प्रवक्ते. यांनी श्री . मनोज कुमार सुर्यवंशी- वसई – विरार महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांना केली आहे.तसेच आपल्या मागणी पत्रकात म्हणतात , दहावी परीक्षा फेब्रुवारी 2026, महिन्याच्या चौथ्या आठवड्यात सुरू होतील. प्रॅक्टिकल परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. त्यामुळे इयत्ता १०वीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षकांना सुध्दा या निवडणूक कामास लावल्यास विद्यार्थ्यां यांच्या अभ्यासाचे नुकसान होणार आहे. तरी त्यांनाही निवडणुकीच्या कामातून वगळावे. मागणी वजा विनंती केली आहे.
श्री केदार काळे यांचे सांगणे आहे, निवडणूक काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव मला आणि सर्वांना ज्ञात आहे. पण नेहमीच शिक्षकांनाच प्रत्येक निवडणुकीच्या वेळी प्राधान्य देण्यात येऊन कामाला लावतात. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य आहे, ते विद्यार्थ्यांना शिकवणे, भारताची भावी पिढी जबाबदार बनविणे, सुशिक्षित तरूण वर्ग करणे आहे यासाठी इतर कार्यापासून शिक्षकांना दुर ठेवणे हिच विनंती.