वाडा शहरातील रहदारीच्या रस्त्याच्या लगत असलेल्या गटारावरील कॉक्रटीकरण स्लॅबला भगदाड, सळ्या ओपन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
वाडा शहरातील रहदारीच्या रस्त्याच्या लगत असलेल्या गटारावरील कॉक्रटीकरण स्लॅबला भगदाड, सळ्या ओपन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही

१९ जानेवारी
पालघर ( एच लोखंंडे ) वाडा शहरातील, शास्त्रीनगर भागात नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभारले आहे. परंतु या जिममध्ये जाण्या येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ. व ओपन जीमच्या आजूबाजूला असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने पार्किंग करण्यात आलेल्या असतात. यामुळे ओपन जिममध्ये व्यायामासाठी जाणारे, शालेय विद्यार्थी, लहान मुले – मुली, तरूण, आणि जेष्ठ नागरिक हे, गटारी वर नगरपंचायतीने टाकलेल्या सिमेंट काँक्रीटच्या स्लाब वरून जातात – येतात असतात. तसेच रात्रीच्या वेळी या विभागात आणि रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली दिसून येत नाही.
यामुळे हा सिमेंट काँक्रीटचा स्लाब, सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारणं परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासोबत. रस्त्याच्या बाजूस बांधण्यात आलेल्या गटारीवरील काँक्रीटच्या स्लॅबला खड्डे पडून, सिमेंट व खडी निघून गेल्याने लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. व स्लाबला भगदाड ही पडलेली आहेत. त्यामुळे येथे कोणत्याही क्षणी, येथून जाणारे यांचा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी शासनाकडून मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही अल्पावधीतच गटारीची व गटारी वरील काँक्रीट स्लॅब ची दुरवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. एवढा निधी खर्च करूनही गटार शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे नागरिकांन मध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांनी तसेच वाडा नगरपंचायत प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, व गटारीचे स्लॅब शरील भगदाड त्वरित बुजवावे, मजबूत व सुरक्षित स्लॅब बनवावा, ओपन जिम परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था आणी साफसफाई करावी, याठिकाणी वाहन पार्किंगबाबत स्पष्ट नियोजन करावे.






