घरेलू देशी उपचार व आयुर्वेदिक मार्गदर्शनातून रोगमुक्त जीवनाचा संदेश

घरेलू देशी उपचार व आयुर्वेदिक मार्गदर्शनातून रोगमुक्त जीवनाचा संदेश
पालघर (प्रतिनिधी):
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत व निकृष्ट आहारपद्धतीमुळे विविध आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी नागरिकांना डॉक्टर, महागडी औषधे, प्रयोगशाळा तपासण्या, रुग्णालये व शस्त्रक्रियांवर अवलंबून राहावे लागत असून मानवी जीवन वेदनामय, तणावपूर्ण व काही प्रमाणात अपंगत्वाकडे झुकत आहे.
या पार्श्वभूमीवर शरीर-स्वास्थ्य कायम निरोगी ठेवण्यासाठी घरेलू देशी उपचार पद्धती, आयुर्वेदिक जीवनशैली, वनस्पती व जडीबुटींचा शास्त्रीय वापर याविषयी सखोल मार्गदर्शन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत युवक-युवतींना फोनद्वारे आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचारांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षणानंतर त्यांच्या राहत्या परिसरात एका महिन्याच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्याची खात्री देण्यात येत आहे.
या मार्गदर्शनाचा मुख्य उद्देश प्रथम कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारून आजारांपासून मुक्त जीवनशैली अंगीकारणे हा आहे. वैयक्तिक अनुभव व दीर्घकालीन अभ्यासाच्या आधारे हे मार्गदर्शन देण्यात येत असून, यामुळे आरोग्यविषयक जनजागृतीबरोबरच युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व कुद्रती तज्ज्ञ व वैद्यराज श्री. मोदीजी करत असून अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी नागरिकांनी ९८७०२५१५७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.