Uncategorized

मुंबई वस्तू व सेवाकर कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा स्नेह मेळावा संपन्न

मुंबई वस्तू व सेवाकर कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा स्नेह मेळावा संपन्न
२२ डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) महाराष्ट्र शासनाच्या मुंबई विभागीय जुने विक्रीकर आणि आताचे नवे वस्तू व सेवाकर या शासकीय कार्यालयात आपली सेवा देऊन, नियमांनुसार सेवानिवृत्त आणि आताही सरकारी सेवेत नोकरी करीत असलेले, कार्यरत अधिकारी – कर्मचारी यांचा ६ वा स्नेह मेळावा दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी अमिवाडी बॅन्क्वेट हाॅल, बोरिवली पश्चिम, मुंबई येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न करण्यात आला.
सदर स्नेह मेळाव्यात श्री. संजय इमानदार – प्रख्यात योग शिक्षक व समुपदेशक, तथा समाजसेवक, यांनी मार्गदर्शन करताना, उत्तम आरोग्य व आहारासंबंधी व आंनदी जगण्याची कला या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री.अशोक चावरे – सेवानिवृत्त राज्य कर सह आयुक्त महाराष्ट्र राज्य- यांनी विशेष उपस्थिती दर्शवून, सांगितले समोपदेशन हे मेळाव्यात उत्साही वातावरण निर्माण करण्याकरिता आवश्यक आणि गरजेचे आहे असे ही नमूद करुन या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
सदर मेळाव्यात वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या सरकारी खात्यातील सेवानिवृत्त श्री. विठ्ठल धनावडे, श्री.तुळशीदास पोळ, श्री.कांबळे, श्रीम. नंदिनी मांजरेकर, श्रीम.लीला हडप आणि श्रीम. वैशाली शेडगे या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सहकारी आणि श्री. अनिल मुंडे – कार्यरत सहाय्यक राज्यकर आयुक्त . अनिल मुंडे ( वस्तू व सेवाकर विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल) यांचा तसेच विविध क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या कार्याच्या माध्यमातून नेहमीच पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सेवानिवृत्त सुरेश विटकर, (योग गुरु), विजय (बाळ) पंडीत, (पत्रकार व सामाजिक कार्य), . रघुनाथ मोहिते(कवी व लेखक), पुरुषोत्तम दाते व संध्या रांगणे(कॅरम पटू) यांच्या बरोबर सरकारी कार्यालयात कामे करत असताना वरिष्ठ पदांवर पदोन्नत झालेल्या सहकाऱ्यांचा ही याप्रसंगी यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी श्री. सुबोध किर्लोस्कर यांनी सांगितले, शासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या ८ व्या केंद्रीय वेतन आयोगात. कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरुच राहणार व मिळणारच. अफवांवर विश्वास ठेऊ नये. व्हाॅटस्अप गृप किंवा इतर प्रसार माध्यामातून प्राप्त होणारी माहिती हि खरी असतेच असे नाही. प्रत्येकाने शहानिशा करून घ्यावी.
स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रतिमा कांदळगावकर व समाधान सुर्वे यांनी केले. श्रीकांत धुरी यांनी स्नेह मेळावा यशस्वी केल्याबद्दल उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सदर स्नेह मेळावा यशस्वी करण्याकरिता सत्यवान तोंडवळकर, सुरेश चाळके, सुजित सावंत,जय अनसुरकर, शरद मयेकर, विलास कांदळगावकर, चंद्रकांत पाचणेकर, शिल्पा देसाई, वृषाली सावंत, प्रकाश पितळे, किशोर कडुलकर यांनी भरीव योगदान दिले. स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या व उपस्थित सर्वांना कालनिर्णय २०२६ दिनदर्शिका आणि भेटवस्तू देऊन एकमेकांना भेटतात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button