Uncategorized

स्थलांतरित व वंचित मुलांना शाळेत दाखल केले; प्रशासन आणि स्पर्श फाउंडेशनचा समन्वय

स्थलांतरित व वंचित मुलांना शाळेत दाखल केले; प्रशासन आणि स्पर्श फाउंडेशनचा समन्वय
पालघर (प्रतिनिधी)
पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजूर कुटुंबे आणि वंचित घटकांतील २३ शाळाबाह्य मुलांना शाळेत अधिकृत प्रवेश मिळाला असून जिल्हा परिषद आणि स्पर्श फाउंडेशनच्या समन्वयाने राबविलेल्या विशेष मोहिमेचा हा परिणाम आहे. या मुलांना शालेय गणवेश वितरित करण्यात आले असून, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य लवकरच पुरवले जाईल.
स्पर्श फाउंडेशनने रजई वाटप उपक्रम राबविताना पालघर येथील आरोग्यम रुग्णालय परिसरात शाळेबाह्य मुले निदर्शनास आली. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फाउंडेशनने २९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याशी संपर्क साधला.
जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांना यात लक्ष घालण्यास सांगितले.

दरम्यान स्पर्श फाउंडेशनने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून 3 डिसेंबर रोजी 23 मुलांची यादी सादर करून ही माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांना दिली गेली. त्या अनुषंगाने
28 डिसेंबर सायंकाळी 5.30 वाजता मनोज रानडे यांनी स्वतः शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) व्यंकटराव हुंडेकर, फाउंडेशनच्या अध्यक्ष रुतू संखे यांचे सह भेट दिली
यावेळी मुलांची वास्तव्यस्थिती आणि शालेय प्रवेशाची गरज तपासण्यात आली. पालक व मुलांना शाळेत प्रवेश घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याप्रमाणे
29 डिसेंबर 2025 रोजी 12 मुले नाना नानी पार्क जवळील अंगणवाडी व 14 मुलांची जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये मुलांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

“जिल्ह्यात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, ही आमची जबाबदारी आहे. अशा मोहिमांना पुढील काळात वेग देण्यात येईल,” असे रानडे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button