मा.श्री. राजेंद्र गावित आमदार यांच्या कडून, सागर तटीय विकास कामाचा आढावा, व भुमिपुजन


मा.श्री. राजेंद्र गावित आमदार यांच्या कडून, सागर तटीय विकास कामाचा आढावा, व भुमिपुजन
२३ जानेवारी
पालघर ( एच लोखंंडे ) मा.श्री. राजेंद्र गावित आमदार पालघर विधानसभा यांच्या कडून दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या कडून मंजूर, चिंचणी खाडी नाका ते मोरी पाडा समुद्रावर जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे मा.श्री.राजेंद्र गावित साहेब यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थित भुमिपुजन करण्यात आले.
तसेच याच दिवशी पालघर शासकीय विश्राम गृहात, महाराष्ट्र सागरी मंडळ मार्फतच मंजूर व प्रस्तावित कामे व काही महत्त्वाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. पालघर मतदार संघातील तसेच पालघर तालुक्यात येणाऱ्या केळवा, धाकटी डहाणू, झाई ते बोर्डी पर्यंत असलेल्या सागर तटीय विकास कामाचा आढावा बैठक आणि, सातपाटी- येथील फिशिंग हॅर्बर, वडरई – परमहंस आश्रम कडे जाणारा रस्ता, वडराई – सुळपाडा समुद्राकडे जाणारा रस्ता, खारेकुरण – स्मशानभूमीकडे जाणार रस्ता व नाईकपाडा – नाईक मैदान संरक्षक भिंत, एडवण- आशापुरा मंदिर येथे वाहन तळ, तारापूर – लाल दरवाजा आंबेडकर नगर- येथे संरक्षण भिंत, नवापूर-दांडी, केळवा -; मांगेला आळी ते माहीम टेंभी पर्यंत मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला.
हँमस् अंतर्गत मंजूर कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले. तर एम.एस.आर.डी.सी.कडे वर्ग करण्यात आलेली कामे एम.एम.बी. व पतन मार्फत करण्याची सूचित करण्यात आले. या आढावा बैठकीत मा.श्री. राजेंद्र गावित आमदार साहेब यांच्या सह श्री. तुषार पाटोळे – कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड, श्रीम. सुरेखा पवार – पतन अभियंत्या, श्री. सावंत अभियंता, श्री.दिनेश पाटील – उप – आयुक्त, मत्स्य व्यवसाय विकास पालघर, श्री. जाधव – उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, श्री. पगारे , श्री.चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभाग सक्षम अधिकारी, आदी उपस्थित होते.