राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. ललित माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. ललित माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन
बोईसर :पालघर जिल्ह्यातील सेवाभावी संस्था राष्ट्रीय हिंदू सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व समाजसेवक श्री. ललित माळी यांच्या पूज्य मातोश्री सौ. फुलीबाई पुखराज माळी यांचे दीर्घ आजाराने मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२६ रोजी त्यांच्या मूळ गावी राणी, जि. पाली (राजस्थान) येथे दुःखद निधन झाले.
त्या रामस्नेही संप्रदायाच्या निष्ठावंत अनुयायी होत्या व आयुष्यभर केवळ भक्तीत लीन राहून धर्ममार्गाचे पालन करीत होत्या. त्यांच्या निधनामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी राणी येथील निवासस्थानावरून त्यांच्यावर धार्मिक विधी-विधानानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. जैतारण येथून पधारलेले सद्गुरू संत श्री. हजारीमलजी गेहलोत यांच्यासह अनेक रामस्नेही संतांच्या उपस्थितीत गाजे-बाजे आणि भक्तिमय वातावरणात त्यांच्या निवासस्थानापासून मोक्षधामापर्यंत भव्य वैकुंठी यात्रा काढण्यात आली.
या वैकुंठी यात्रेत माळी समाजासह विविध समाजातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
साधा स्वभाव, निस्वार्थ सेवा, धर्मनिष्ठा व पुण्यकर्मांनी युक्त फुलीबाई माळी या सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होत्या.
त्यांचे निधन हे समाजासाठी अपूरणीय क्षती असून त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.