सफाळे पुर्व येथे सुरक्षा अभियानांतर्गत ट्राफीक पोलिस अंमलदारान व्दारे जनजागृती

सफाळे पुर्व येथे सुरक्षा अभियानांतर्गत ट्राफीक पोलिस अंमलदारान व्दारे जनजागृती
४ जानेवारी
सफाळे ( एच लोखंंडे ) ३७ व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत मा.श्री. यतिन देशमुख पालघर जि. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. सुरेश साळुंखे – वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सफाळे पुर्व ता.जि.पालघर रेल्वे रिक्षा स्टँडवर असलेल्या रिक्षा चालक, वाहक आणि मोटरसायकल धारकांना पालघर जिल्हा वाहतूक शाखेचे सफाळे येथे कार्यरत श्री. बाळासाहेब यमगार ASI आणि पोलिस अंमलदार श्री खेतले यांनी तिनं चाकी वाहन चालक, मोटरसायकल धारकांना, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि रस्ते अपघात कमी करणे हे सुरक्षा सप्ताहचा मुख्य उद्देश आहे,
यासाठी दोन चाकी वाहन चालकाची हेल्मेट आणि चार चाकी वाहन चालकांनी वाहन सीट बेल्टचा वापर करणे अनिवार्य आहे. हे अपघात झाल्यास गंभीर इजा टाळण्यास मदत करते. वेगमर्यादेचे पालन करित वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कोणतेही वाहन दारू पिऊन चालवणे टाळा, कारण यामुळे अपघात होऊ शकतात. वाहतूक सिग्नल, लेन कटिंग आणि इतर सर्व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
वाहन चालवताना विचार करून सावधपणे गाडी चालवा. वाहन चालवतांना मोबाइलचा वापर / फोनवर बोलणे किंवा मेसेज करणे टाळा. नियमित पणे गाडीचे ( वाहनाचे) टायर, ब्रेक आणि लाईट्स व्यवस्थित आहेत का, हे तपासा कारणे, आपल्या गाडीत / रिक्षेत बसणारे हे आपल्यावर विश्वास/ भरोसा ठेऊन आपल्या गाडीत प्रवास करीत आहेत. प्रवासी आणि आपली काळजी घेणे गरजेचे आहे, आपल्या प्रमाणे त्यांचीही कोणी वाट पाहत असतात. हे लक्षात घेऊन वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
या सर्व गोष्टींचे पालन करून, प्रत्येक वाहन चालक हे “सुरक्षा सप्ताह’ यशस्वी करण्यात मदत करू शकतात . असेही मार्गदर्शन करताना श्री.यमगार साहेब आणिश्री.खेतले अंमलदार यांनी जमलेल्या गाडी चालकांना मार्गदर्शन करताना सांगितले.