Uncategorized

एका प्रतिष्ठित व्यक्तीचे अपशब्द व समाजात रोष!

एका प्रतिष्ठित व्यक्तीचे अपशब्द व समाजात रोष!

दि. 10 जानेवारी 2026
मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील)
आज दि. १० जानेवारी रोजी गावदेवी शेतकरी संघटना दिवे च्या वतीने मिनाक्षी शिंदे (मा. महापौर ठाणे) यांनी आगरी समाजाबद्दल एकदम खालच्या पातळीने केलेल्या वक्तव्याबद्दल नारपोली पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे.
लवकरच व्हिडिओ ची सत्यता पडताळून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अश्वाशीत केले.
तसेच संघटनेच्या वतीने मा. मुख्य निवडणूक आयोग तसेच मा. पोलीस आयुक्त यांना देखील कायदेशीर कारवाई करण्याकरिता पत्र देण्यात आले. तसेच मा. खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा ) याच्या सह शंभर ते दिडशे स्थानिक भुमिपुत्र ठाणे राबोडी पोलीस ठाण्यात आगरी समाजाबद्दल अक्षेपार्य विधान व टिपणी फोन द्वारा चित्रफित बाबत तक्रार वकीलासह जमले होते,तिथेच मिडीयासमोर खासदार म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया मांडली, समाजाचे काहीच घेणेदेणे नसताना उगाच काहीतरी वायफाय बडबङ करून समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत्य करू नये, जर एखाद व्यक्ती, कार्यक्रर्ता पक्षात असून देखील इलेक्शन काळात वैयक्तिक कारणाने वेळ देऊ शकत नसेल तर दबाव व जातीवाचक उल्लेख करू शकत नाही, तो कोणत्या ही समाजाचा असो!कार्यकर्ते हे पगारी नसतात तर फक्त निष्ठावंत असतात. त्यामुळे त्याला कोणतेही बंधन नसते.साहजिकच कोणत्याही समाजा प्रती अस्मिता व प्रेम असते म्हणून काही बोलून भावना दुखावली जाऊ नये याची खबरदारी घेणे अवश्य आहे. अनेक स्थानिक भुमिपुत्राचा रोष वाढला असून मा. खासदार व वरीष्ठ पोलीस यांनी जनतेला शांतता भंग करू नये असे आव्हान केले. संबंधित प्रकाराची सत्यता पडताळणी करून कारवाई करण्यात येईल असे अश्वासन दिले. अनेक स्थानिक भुमिपुत्रानी आपल्या संस्थे तर्फे पोलीस व सायबर सेल ला निवेदन व तक्रार दिल्या आहेत. ठाणे, भिवंडी, वसई, कल्यान,मुबंई, नवीमुंबई योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी. आणि भविष्यात कोणत्याही समाजाला उद्देशून, हिन अपशब्द बोलू नये. ज्यांमुळे वादाचे पडसाद महाराष्ट्रभर पसरून कायदा, सुव्यवस्था भंग होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button