रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी स्वामी इनस्टीट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा पुढाकार, विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम ?



रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी स्वामी इनस्टीट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा पुढाकार, विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम ?
नाशिक / सतीश पाटील
२२ फेब्रुवारी २०२६
रोजी स्वामी ईस्टीटयुट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर संस्थेचे अध्यक्ष श्री संजय गायकवाड ,सचिव सौ. संगीताताई गायकवाड, डायरेक्टर श्री तेजस गायडवाड ,श्री . वैभव लढे ( RTO Inspector), सौ . भावना जाधव ( RTO सहाय्यक) व श्री सुनिल ठुकले उपस्थित होते श्री वैभव लढे व सौ भावना जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, हेल्मेट सक्ती, सीटबेल्टचा वापर, आणि अपघात कमी करण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची माहिती दिली , सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुरक्षा पुस्तीकेचे वाटप करण्यात आले आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. डॉ. प्रशांत चव्हाण सर यांनी केले , कार्यक्रमास प्राचार्य किरण पाटील, सौरभ अग्रवाल ,
स्वामी पॉलीटेकनीचे प्राचार्य श्री. प्रकल्प पाटील सर उपस्थित होते , सदर कार्यक्रमा साठी संकेत शिंदे, सागर हिरे , दिपांजली चव्हाण , अजीत शहा, सौ . शितल कापडणीस आदिनी परिश्रम घेतले.