Uncategorized

“महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” कार्यशाळा ग्लोबल कोकण महोत्सव, शिरगाव बीच, पालघर येथे संपन्न.

“महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” कार्यशाळा ग्लोबल कोकण महोत्सव, शिरगाव बीच, पालघर येथे संपन्न.

प्रतिनिधी – पालघर
मा. विकास आयुक्त (उद्योग) श्री. दिपेंद्र सिंह कुशवाह यांचे नेतृत्वात व मा. जिल्हाधिकारी, पालघर डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या मार्गदर्शनाखाली महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. भाऊसाहेब फटांगरे, मा. उपविभागीय अधिकारी, डहाणू श्री. विशाल खत्री (भा.प्र.से.) व सहसंचालक, उद्योग, कोकण विभाग श्रीमती विजू सिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्लोबल कोकण महोत्सव 2026 शिरगाव बीच, पालघर येथे येथे संपन्न झाली.
मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री. भाऊसाहेब फटांगरे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या काळात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे. जिल्हयाच्या किनारी, डोंगरी व नागरी अश्या विविधांगी प्रदेशांचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. या संधीचा लाभ घेऊन युवकांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे.
मा. उपविभागीय अधिकारी, डहाणू श्री. विशाल खत्री (भा.प्र.से.) यांनी आश्वासन दिले की, उद्योजकांना लागणारी सर्व मदत पुरविण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर आहे. त्यासाठी उद्योजकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील सुशिक्षीत युवक युवतींनी आपली मानसिकता बदलून उद्योंगाकडे वळावे.
सहसंचालक, उद्योग, कोकण विभाग श्रीमती विजू सिरसाठ यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पालघर जिल्ह्याचा राज्याच्या निर्यातीमधील वाटा उत्तरोत्तर वाढत असून मागील वर्षी रु.30,138 कोटी एवढी निर्यात साध्य केली आहे. चिकू व सागरी उत्पादने या एक जिल्हा एक उत्पादनांना (ODOP) विविध प्रदर्शने व योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. नवउद्योजकांनी उद्योग विभागाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा लाभ घेऊन स्वताचा उद्योग सुरु करावा असे आवाहन त्यांनी केले.
श्री. प्रमोद थावरे, विदेश व्यापार विकास अधिकारी, DGFT, Mumbai यांनी निर्यातीसाठी लागणाऱ्या विविध परवाने व निर्यातीसाठीच्या योजना यांची माहिती दिली. श्रीमती रिशु वर्मा, वरिष्ठ कार्यकारी, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गेनाइजेशन्स (FIEO) यांनी विविध क्षेत्रातील निर्यात प्रोत्साहन परिषदा व मंडळे यांची व निर्यातीसाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याबाबत माहिती दिली. श्री. अनिल जाधव, वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक यांनी न्यु इंडिया एशोंरन्स कंपनीच्या आग, चोरी, व्ययक्तीक अपघात, मशीनरी ब्रेकडाऊन इ. संकंट प्रसंगी उपलब्ध असणाऱ्या विम्याबाबत उपस्थितांना अवगत केले. आय.डि.बी.आय. कॅपिटलचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. उमेश रनोलिया यांनी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी अर्थ सहाय्याबाबत माहिती दिली. अभिनव इंस्टिट्युटचे व्यवस्थापक श्री. अफान हैदर यांनी स्किल इंडिया अंतर्गत अप्रेंटिसशिप योजनेबाबत सादरीकरण केले. मैत्रीचे नोडल अधिकारी श्री. विजय शिंदे यांनी ईज ऑफ डुईंग बिजनेस अंतर्गत महाराष्ट्र शासनाने केलेल्या विविध सुधारणा व मैत्री कायदा आणि त्या अंतर्गतचे नियम याबाबत माहिती दिली. वास्तुविशारद श्री. योगेश म्हात्रे यांनी पर्यटन व्यवसायातील होम स्टे, रिसोर्ट, हॉटेल्स इ. साठी लागणाऱ्या बांधकाम परवानग्या व त्याची प्रक्रिया याबाबत माहिती दिली. करिअर रेजर च्या संस्थापिका श्रीमती दिपा राऊत यांनी RAMP व IDEMI च्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री उपेंद्र सांगळे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या उद्योगांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनतर उपस्थित उद्योजकांच्या शंकाचे समाधान मान्यवरांनी प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये केले. शेवटी व्यवस्थापक श्री उध्दव माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी ग्लोबल कोकण महोत्सव मध्ये चिकू उत्पादने (ODOP) व तारापूर येथील उद्योगांची दालने प्रदर्शित करण्यात आली आहेत. कार्यशाळेचे सुत्रसंचालन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी श्री धम्मपाल थोरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, रोटरी क्लब ऑफ विरार, एमसीईडी, मिटकॉन यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button