मूकबधिर विद्यालय व वृद्धाश्रमात रिपाई व बिजदत्ता वेलफेअर असोसिएशनकडून मकरसंक्रांती साजरी





मूकबधिर विद्यालय व वृद्धाश्रमात रिपाई व बिजदत्ता वेलफेअर असोसिएशनकडून मकरसंक्रांती साजरी
पालघर | प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व बिजदत्ता वेलफेअर असोसिएशन, पालघर यांच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत मूकबधिर विद्यालय, पालघर तसेच आनंद ऋद्धाश्रम, शिरगाव येथील मुलांना पतंग, तिळगूळ व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच आश्रमातील वृद्धांना फळे व तिळगूळ देऊन सण साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी संस्थेचे संचालक सुरेश जाधव, रिपाईच्या महिला उपाध्यक्ष सुप्रिया जाधव, शहर संघटक सचिन घाडीगावकर, महिला संघटिका पूजा केवट, युवा कार्यकर्ते दीपेश गायकवाड, गणेश घाडीगावकर, रक्षा शर्मा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सणाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा हा उपक्रम असून सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम पुढेही सुरू राहतील, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.