Uncategorized

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची पालघर मिनी सरस व ग्लोबल कोकण महोत्सवास भेट

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची पालघर मिनी सरस व ग्लोबल कोकण महोत्सवास भेट


पालघर (प्रतिनिधी) : पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पालघर मिनी सरस’ तसेच ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’स विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, लेखिका व वक्त्या डॉ. आरती सूर्यवंशी उपस्थित होत्या. त्यांनी विविध स्टॉलना भेट देत महिला स्वयंसहायता गटांच्या सदस्यांशी संवाद साधला.
विभागीय आयुक्तांनी महिला गटांनी उभारलेल्या हस्तकला, घरगुती उत्पादने तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची पाहणी केली. उत्पादनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेत काही वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी करून त्यांनी महिला गटांना प्रोत्साहन दिले. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या दर्जेदार उत्पादनांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
“पालघर मिनी सरस आणि ग्लोबल कोकण महोत्सवात महिलांनी तयार केलेली उत्पादने पाहून आनंद झाला. स्थानिक पातळीवर इतक्या चांगल्या दर्जाचे साहित्य तयार होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांना सर्वांनी पाठिंबा द्यावा,” असे मत डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
डॉ. आरती सूर्यवंशी यांनीही महिला सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या कामाविषयी जाणून घेतले व त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते तसेच उमेद अभियानाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button