Uncategorized

अन्नत्याग – पाणीत्याग अमर उपोषणमाजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे यांचे नगर परिषद पालघर विरोधात आंदोलन

अन्नत्याग – पाणीत्याग अमर उपोषण
माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे यांचे नगर परिषद पालघर विरोधात आंदोलन
पालघर (प्रतिनिधी) –
मी माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे, सध्या पालघर येथे वास्तव्यास असून, मी १९ वर्षे देशसेवा केली आहे. देशसेवेनंतर पालघर येथे स्वतःचे घर बांधले असून, त्या घरासाठी नगर परिषद पालघरकडून रीतसर बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. सदर मालमत्तेचा प्रॉपर्टी कर दिनांक ०१/०७/२००९ रोजी भरलेला आहे.
माझा जुना प्रॉपर्टी नंबर ४०२१ (सी झोन), पालघर पूर्व असा आहे.
माजी सैनिकांना शासन निर्णयानुसार मालमत्ता कर माफी मिळावी, यासाठी मी दिनांक २३/०२/२०११ रोजी नगर परिषद पालघर व तत्कालीन नगराध्यक्ष मनोहर सोनू दांडेकर तसेच नगरसेवकांना लेखी निवेदन दिले होते. त्यासोबत कल्याण-डोंबिवली व मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील माजी सैनिकांना करमाफीचे आदेश जोडून सादर केले होते.
तथापि, २०११ नंतर आजतागायत नगर परिषद पालघर यांनी मला एकदाही मालमत्ता कराचे मागणीपत्र (बिल) दिले नाही. एकूण १५ वर्षे करबिल न देणे हे गंभीर प्रशासकीय दुर्लक्ष आहे. करमाफी न देण्याबरोबरच माझी मालमत्ता नगर परिषदच्या संगणक व दप्तरातून गहाळ करण्यात आली आहे, असा माझा ठाम आरोप आहे.
याव्यतिरिक्त, घोलवीरा येथे माझ्या नावावर दोन मालमत्ता दाखवण्यात आल्या आहेत, त्या प्रत्यक्ष जागेवर मला दाखवून माझ्या ताब्यात देण्यात याव्यात, अशी माझी मागणी आहे.
मी मागासवर्गीय व माजी सैनिक असूनही नगर परिषद पालघरकडून सातत्याने अन्याय व दिशाभूल केली जात आहे. या सर्व प्रकाराविरोधात न्याय मिळावा, यासाठी दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मोरेकरुण रोड, पालघर येथे अन्नत्याग व पाणीत्याग अमर उपोषण करणार आहे.
उपोषणादरम्यान माझ्या जीवितास काहीही धोका किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व नगर परिषद पालघर यांची राहील.
या उपोषणासाठी होणारा संपूर्ण खर्च नगर परिषद/शासनाने करावा, अशी माझी मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button