Uncategorized

बोईसरमध्ये प्रथमच जटिल अँजिओप्लास्टी यशस्वी।

बोईसरमध्ये प्रथमच जटिल अँजिओप्लास्टी यशस्वी।

बोईसर(प्रतिनिधि): वरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बोईसर येथे हृदयरोग उपचारांच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून, बोईसरमध्ये प्रथमच रोटा (Rotational Atherectomy) अँजिओप्लास्टी ही अत्याधुनिक व जटिल हृदय प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. ही प्रक्रिया डॉ.नील स्नेहल (DM कार्डिओलॉजी) यांनी त्यांच्या अनुभवी टीमसह यशस्वीपणे केली.
सदर रुग्ण दत्तात्रय पाटील (वय ७८ वर्षे) यांना गंभीर हृदयरोगामुळे इतरत्र बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता. मात्र वय आणि एकूण प्रकृती लक्षात घेता बायपास शस्त्रक्रिया अधिक जोखमीची ठरू शकते, असे निदर्शनास आल्याने रुग्ण वरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ.नील स्नेहल यांच्याकडे दाखल झाले.
सखोल तपासणी व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे डॉ.नील स्नेहल यांनी रुग्णासाठी रोटा अँजिओप्लास्टी हा सुरक्षित व योग्य पर्याय असल्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अत्यंत कडक व कॅल्शियमयुक्त ब्लॉकेज असल्याने रोटा अँजिओप्लास्टीद्वारे ते ब्लॉकेज यशस्वीरीत्या काढून रक्तप्रवाह पूर्ववत करण्यात आला.
ही प्रक्रिया बोईसर परिसरात पहिल्यांदाच करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही अभिमानाची व दिलासादायक बाब ठरली आहे. यामुळे गंभीर हृदयरोग असलेल्या रुग्णांना आता उपचारांसाठी मुंबई किंवा दूरच्या शहरांत जाण्याची आवश्यकता राहणार नाही असे मत अनेकानी व्यक्त केले.
या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ. साईदास लिंगनवाड तसेच वरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय व कॅथलॅब टीमवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनीही डॉक्टर व संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.वरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कार्डियेक कॅथलॅब,२४×७ हृदयरोग आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञांची टीम उपलब्ध असून,बोईसर व परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार व आधुनिक हृदयसेवा येथे दिली जात असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button