मा. ना. रामदास आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड — पालघरमध्ये जल्लोषात सत्कार



मा. ना. रामदास आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड — पालघरमध्ये जल्लोषात सत्कार
पालघर, (प्रतिनिधी)दि. ४ मार्च २०२६ — केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पालघर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा अभिनंदनपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, साहेबांचे पीए प्रवीण मोरे, हेमंत रणपिसे, युवा नेते पप्पू कागदे, जीत आठवले, महेंद्र गायकवाड, दीपेश गायकवाड, गणेश घाडीगावकर आणि सतीश निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी आठवले साहेबांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताची कामे अधिक वेगाने होतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.