विरार रेल्वे स्थानक पुर्नबांधणी…..!


विरार रेल्वे स्थानक पुर्नबांधणी…..!
विरार रेल्वे स्थानकाचे नव्याने निर्माण कार्य सुरू असून त्यामध्ये विरार-डहाणू तिसरी-चौथी लाईन आणि विरार-बोरीवली पाचवी सहावी लाईन ह्या दृष्टीने जेव्हा विरार रेल्वे स्थानक संपूर्ण नवीन तयार होईल त्यानंतर प्लेटफॉर्म नंबर मध्ये होणाऱ्या बदला बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार अपेक्षित बदल अंदाजे खालील प्रमाणे असू शकतात,तथापि त्यामध्ये बदल होऊ शकतात..!
🟣 विरार प्लेटफॉर्म नंबर-1 हा प्लेटफॉर्म नंबर -3 होईल. जो चर्चगेट हून येणाऱ्या गाड्यांसाठी होम प्लेटफॉर्म असेल.
🟣 विरार प्लेटफॉर्म नंबर- 2 हा प्लेटफॉर्म नंबर- 4 होईल.जो चर्चगेट हून येणाऱ्या गाड्यांसाठी होम प्लेटफॉर्म असेल.
🟣 विरार प्लेटफॉर्म नंबर-3 हा प्लेटफॉर्म नंबर-5 होईल जो चर्चगेट-डहाणू साठी धीमी डाऊन लाईन असेल. [ही लाईन चर्चगेट ते विरार जलद असेल विरार नंतर धीमी लोकल होईल]🟣 विरार प्लेटफॉर्म नंबर-4 हा प्लेटफॉर्म नंबर-6 होईल. जो डहाणू ते चर्चगेट धीमी अप लाईन असेल. [ही डहाणू ते विरार पर्यंत धीमी असेल विरार नंतर जलद लोकल होईल]🟣 विरार प्लेटफॉर्म नंबर- 5 हा प्लेटफॉर्म नंबर-7 होईल. जो मेल एक्सप्रेस साठी डाऊन जलद लाईन असेल. मुंबई सेंट्रल ते दिल्ली, गुजरात कडे जाणाऱ्या गाड्यांसाठी असेल.
🟣 विरार प्लेटफॉर्म नंबर-6 हा प्लेटफॉर्म नंबर-8 होईल. जो विरार-सुरत ,विरार-वलसाड शटल ,पेंसजर आणि चर्चगेट-विरार लोकल, विरार-डहाणू लोकल साठी होम प्लेटफॉर्म म्हणून सुद्धा उपयोगात आणला जाईल.
🟣 विरार पुर्वेकडील मालगाडी लुप लाईन ही मेन अप जलद लाईन कार्यरत होईल आणि ह्या लाईनवरून दिल्ली, गुजरात येथून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी असेल आणि त्यापेकी विरार येथे थांबणारी गाडी नवीन होणाऱ्या प्लेटफॉर्म नंबर-9 वर थांबा घेऊन मुंबई सेंट्रलला जाईल. हा प्लेटफॉर्म विरार पुर्वेला असलेल्या डि-मार्ट च्या समोर असेल.
🟣 विरार येथे नवीन निर्माण होणारे प्लेटफॉर्म नंबर-1 आणि 2 हे विरार पच्छिमेस चर्चगेट दिशेला असतील हे प्लेटफॉर्म चर्चगेट हून विरार येथे पोहचणाऱ्या विरार लोकल साठी होम प्लेटफॉर्म असतील आणि ते विरार पुर्वेला असलेल्या डि-मार्ट च्या समोर असतील.
🟣 विरार प्लेटफॉर्म नंबर-3 अ हा प्लेटफॉर्म नंबर-5 अ असेल आणि तो थेट प्लेटफॉर्म नंबर-5 जा जोडला जाईल जो चर्चगेट हून येणाऱ्या डहाणू लोकल साठी डाऊन धीमी लाईन असेल. ह्या प्लेटफॉर्म च्या पच्छिमेस प्लेटफॉर्म नंबर-5 ब होणार आहे त्यामुळे प्रवाशांना दोन्ही साईडला उतरता येईल.तसेच हे प्लेटफॉर्म नंबर-5, 5 अ, 5ब एकत्रित विरार-चर्चगेट आणि डहाणू-विरार लोकल साठी सुद्धा वापरले जातील.
🟣 विरार प्लेटफॉर्म नंबर-4 अ हा प्लेटफॉर्म नंबर-6 अ होईल. जो डहाणू येथून येणाऱ्या लोकल साठी होम प्लेटफॉर्म असेल जो विरार-डहाणू लोकल साठी उपलब्ध होईल.
🟣 विरार ते बोरीवली पाचवी – सहावी लाईन सुरू होईल तेव्हा एक मार्ग धीमी लोकल साठी, दुसरा मार्ग जलद लोकल साठी तर तिसरा मार्ग मेल एक्सप्रेस साठी असेल. डहाणू येणाऱ्या जलद लोकल जलद मार्गावरून जातील तर डहाणू-बोरीवली धीमी लोकल धीम्या मार्गावरून धावतील.
प्रतिक्रिया
येणाऱ्या काळात विरार रेल्वे स्थानकात खूप सारा बदल घडून येणार असून सर्व प्रसार माध्यमांना धन्यवाद द्यायला हवे जेणेकरून हे सविस्तर पणे मांडता आले.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था