Uncategorized

मुरबाड रेल्वे प्रकल्पासंदर्भात आढावामा.खासदार सुरेश म्हात्रे

मुरबाड रेल्वे प्रकल्पासंदर्भात आढावा
मा.खासदार सुरेश म्हात्रे

मुंबई प्रतीनीधी:(सतिश पाटील )
मुरबाड रेल्वे प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (ठाणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी अपेक्षित असलेल्या एकूण खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जमीन संपादन, भूसंपादन प्रक्रिया तसेच रेल्वे मार्ग व इतर पूरक बांधकामांसाठी होणारा अचूक खर्च किती असेल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.

तसेच राज्य शासनाच्या वतीने नव्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली. या बैठकीस रेल्वे विभाग तसेच भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुरबाड रेल्वे प्रकल्पास गती देण्यासाठी आणि शासनाकडे परिपूर्ण व अचूक खर्च निश्चितीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना माझ्या वतीने यावेळी देण्यात आल्या.

मुरबाडच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, प्रकल्प वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button