Uncategorized

वाढवण बंदर प्रकल्पासाठी २२ गावांतील जमीन संपादनाचे दर जाहीरशेतजमिनीला दुप्पट मोबदला, १००% दिलासा व १२% अतिरिक्त रक्कम देणार

वाढवण बंदर प्रकल्पासाठी २२ गावांतील जमीन संपादनाचे दर जाहीर
शेतजमिनीला दुप्पट मोबदला, १००% दिलासा व १२% अतिरिक्त रक्कम देणार


पालघर (प्रतिनिधी):
वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक रस्ता व रेल्वे उभारणीकरिता जमीन संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ च्या कलम ३(अ) अन्वये दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी भारत सरकारच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील डहाणू व पालघर तालुक्यातील एकूण २२ गावांतील जमिनी संपादित करण्यात येत आहेत.
सदर प्रकल्पासाठी संपादन संस्था म्हणून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेकडे निवाडे पाठविण्यात आले असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे.
निश्चित दर पुढीलप्रमाणे
पालघर तालुका (१२ गावे):
शेतजमिनीकरिता प्रती हेक्टरी ६२,५०,००० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. बिनशेती जमिनीकरिता प्रती चौ.मी. ७८० ते २९४० रुपये दर लागू राहील.
डहाणू तालुका (१० गावे):
वरोर, चिंचणी, तणाशी या गावांसाठी शेतजमिनीचा दर १,१६,४४,१०६ रुपये प्रती हेक्टरी असून बावडे, कोलवली, वाणगांव या गावांसाठी १,२२,४२,४०८ रुपये प्रती हेक्टरी दर निश्चित करण्यात आला आहे. काही गावांसाठी ६२,५०,००० रुपये प्रती हेक्टरी दर लागू आहे. बिनशेती जमिनीकरिता ३३४१ ते ३६६४ रुपये प्रती चौ.मी. दर निश्चित करण्यात आला आहे.
मोबदल्याचे सूत्र
निश्चित बाजारभावाच्या दुप्पट रक्कम (२ पट गुणांकन)
त्यावर १०० टक्के दिलासा रक्कम
२९ ऑगस्ट २०२४ पासून मूळ दरावर १२ टक्के अतिरिक्त रक्कम (व्याज)
जमिनीवरील बांधकाम, झाडे, विहीर, बोअरवेल इत्यादी मालमत्तेचे स्वतंत्र मूल्यांकनानुसार नुकसानभरपाई
आवश्यक कागदपत्रे
अद्ययावत ७/१२ उतारा व फेरफार नोंदी
ओळखपत्र (आधार, पॅन, मतदान ओळखपत्र इ.)
बोजा असल्यास संबंधित बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र
बिनशेती आदेश व मंजूर नकाशा (लागू असल्यास)
बँक पासबुक (IFSC कोडसह)
पासपोर्ट आकाराचा फोटो
खातेदार मयत असल्यास वारस हक्काचा पुरावा
संपर्क कार्यालये
तालुका पालघर:
सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), दालन क्र. ११४, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
तालुका डहाणू:
सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सुर्या प्रकल्प, दालन क्र. १०७, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
संपादित क्षेत्रातील खातेदारांना नोटीस बजावण्यात येत असून ६० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह मोबदला स्वीकारणे बंधनकारक आहे. मुदत संपल्यानंतर संबंधित जमिनीचा ताबा घेण्यात येणार आहे. तलाठी कार्यालयांनी सुविधा केंद्र स्वरूपात कामकाज करावे, तसेच नागरिकांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button