Uncategorized

ग्लोबल कोकण महोत्सवात ‘नाती रक्ताची’ची पर्वणी; शिरगाव बीचवर आज खास चित्रपट प्रदर्शन

ग्लोबल कोकण महोत्सवात ‘नाती रक्ताची’ची पर्वणी; शिरगाव बीचवर आज खास चित्रपट प्रदर्शन


पालघर (प्रतिनिधी)
नात्यांची ऊब, कोकणाचा सुगंध आणि सागराच्या साक्षीने एक खास संध्याकाळ अनुभवण्याची संधी पालघरकरांना आज मिळणार आहे. ग्लोबल कोकण महोत्सवाच्या निमित्ताने मराठी चित्रपट ‘नाती रक्ताची’ याचे विशेष प्रदर्शन आज, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता शिरगाव बीच, पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे.
नात्यांची, आपुलकीची आणि भावनांची मनाला भिडणारी गोष्ट मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला पुरस्कार प्राप्त झाले असून, चित्रपटाचे निर्माता रमेश गणपत माळी, लेखक अनंत धर्मा भोईर, दिग्दर्शक विजय पांडुरंग शेडगे आणि सह-दिग्दर्शक जितेंद्र हिरालाल भगत यांनी चित्रपटासाठी परिश्रम घेतले आहेत.
या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या असून, चित्रपट पाहिल्यानंतर नात्यांचे भावविश्व प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभे राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे चित्रपटाचे निर्माता हे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील स्थानिक असून, आपल्या भागातील प्रेक्षकांनी चित्रपट अनुभवावा यासाठीच हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ग्लोबल कोकण महोत्सवाला येणाऱ्या सर्वांसाठी ही एक खास पर्वणी ठरणार असून, चित्रपटातील कलाकार देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून ‘नाती रक्ताची’ या चित्रपटाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button