Uncategorized

डहाणू तालुक्यातील कासा येथे छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न 

डहाणू तालुक्यातील कासा येथे छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न 

डहाणू/प्रसाद भालेराव
अखंड भारताचे दैवत असलेले शूर पराक्रमी महान राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दर वर्षी प्रमाणे यंदा ही डहाणू तालुक्यातील कासा या गावात खूप मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात येणारा सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा १७, १८, १९ फेब्रुवारी असा तीन दिवस सोहळा साजरा केला जातो.
या वर्षी ही १७ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा, १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी बाईक रॅली, संध्याकाळी कासा शिवमंदिर ते शिवशक्ती मैदान कासा अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्या नंतर विविध मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा परिषद ठाणे,माजी समाज कल्याण सभापती पांडुरंग बेलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान गेल्या १५ वर्षांपासून या कासा विभागात अविरतपणे करत असलेल्या सामाजिक कार्या बद्दल तसेच वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमा द्वारे लहान मुलांना एक मोठे आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्या बद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले.
या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उदघाटक जिल्हा परिषद पालघर, माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्या बद्दल माहीती दिली आणि प्रतिष्ठान करत असलेल्या कार्याची प्रशंशा केली.
शेवटी सोहळ्याचे अध्यक्ष व कासा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच हरेश मुकणे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात विविध विषयावर मनोगत व्यक्त केले. सोहळ्याचे मुख्य आकर्षण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शाहीर शीला पाटील यांचे”जिजामाता शाहीर कलापथक कोल्हापूर”होते.या कलापथक ने खूपच सुंदर पोवाडा सादर केला तसेच आजचे तरुण-तरुणी, व्यसन, प्रेम, मोबाईल या मध्ये कसा आहारी जाऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे नुकसान करून घेतोय याबाबत अतिशय मुद्देसूद प्रबोधन केले.या प्रसंगी वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये सहभाग झालेल्या सर्व स्पर्धक मधून जे विजयी झाले होते.त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले आणि शेवटी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश शेकडे यांनी आभार व्यक्त केले शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी उदघाटक म्हणून श्री काशिनाथ चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग बेलकर, माजी पंचायत समिती डहाणू सदस्या स्वाती राऊत , कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील, महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना(शिंदेगट) डहाणू तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे(अजित पवार ) डहाणू तालुकाध्यक्ष विपुल राऊत, कासा शाळेचे पर्यवेक्षक सि.एस.पाटील, सिद्धार्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनिल निरभवणे, जय माँ चामुंडा ग्रुप चारोटी नाकाचे अध्यक्ष भरत भरवाड, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पटेल, कासा येथील उद्योजक शब्बीर घाची, सिद्धार्थ मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष हरेश गायकवाड, कासा शाळेचे माजी क्रीडा शिक्षक आणि सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर महेंद्र पवार, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक प्रकाश मरले, मंडळ अधिकारी कुमार कुंढारे, माधवी डगला, डॉ.शरद पाटील रावसाहेब जाधव, शैलेश वाघ, संतोष तळेकर,सोपान निर्मळ,श्रीकांत सुक्ते, बापू चव्हाण, शाहू भारती,नितीन भांगिरे,मनोज पाटील,समाधान पाटील, रामलाल मेहेत्रे, राम भारती उपस्थित होते आणि या सोहळ्याचे सूत्रसंचालन कदम दाम्पत्यांनी केले.
सर्व मान्यवर आणि उपस्थित शिवप्रेमीचे छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समशेर माणेशिया (शेराभाई) यांनी आभार व्यक्त केले.आणि दर वर्षी अश्याच प्रकारे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जास्तीतजास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले
प्रतिष्ठान तर्फे घेण्यात येणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारिणी एक महिन्या पासून परिश्रम घेत असते आणि या मध्ये प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीच्या प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्य यांचे बहुमूल्य योगदान असते.विशेष म्हणजे या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी कुठल्या ही प्रकाराची वर्गणी गोळा केली जात नाही आणि सोहळ्याच्या तिन्ही दिवशी सर्व शिवप्रेमींसाठी भोजन व्यवस्था करण्यात येते.अश्या प्रकारे या वर्षी ही हा शिवजन्मोत्सव सोहळा मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button