Uncategorized

माझी वसुंधरा” मोहिमेत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश

माझी वसुंधरा” मोहिमेत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश


पालघर (प्रतिनिधी)ग्रामपातळीवर राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा” मोहिमेत गावातील सर्व घटकांच्या एकजुटीमुळे उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, सर्व लाईन विभागांचे अधिकारी, सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य व कर्मचारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा व आशा सुपरवायझर, रोजगार सेवक, पेसा मोबिलायझर, पोलीस पाटील, विविध बचत गट, महिला मंडळ, सीआरपी, गणेश कृषक बचत गट, तसेच सर्व समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, बाळगोपाळ, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेत मोहिमेला यशस्वी केले.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण व ग्रामविकास या उपक्रमांमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गाव स्वच्छ, हरित व सुंदर करण्याचा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला असून, लोकसहभागातून सकारात्मक बदल घडून येत असल्याचे या मोहिमेतून दिसून आले.
ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे “माझी वसुंधरा” अभियानाला भक्कम बळ मिळाले असून, भविष्यातही अशाच एकजुटीने पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button