Uncategorized

कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाची राज्यस्तरीय करीअर कट्टा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाची राज्यस्तरीय करीअर कट्टा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी


पालघर : (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि करीअर कट्टा विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाने पालघर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट प्राचार्य हा सन्मान प्राप्त झाला.
सोलर एनर्जी स्पर्धा, रील स्पर्धा, तसेच AWS करिअर टूर्स अशा विविध उपक्रमांत महाविद्यालयाने विशेष प्राविण्य मिळविले. या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये करण्यात आले होते.
कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत, राज्यमंत्री दर्जा मा. रवींद्र साठे तसेच सचिन इटकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या यशामागे करीअर कट्टा समन्वयक प्रा. रितेश हटकर, प्रा. अमोल दबडे, प्रा. दिपाली भापकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा करीअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक (पालघर जिल्हा) डॉ. बी. ए. राजपूत यांचे विशेष प्रयत्न महत्त्वाचे ठरले. प्राचार्यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले, असे मत प्रा. रितेश हटकर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button