Uncategorized

बार्टी व एम सी ई डी मार्फत मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमविवा महाविद्यालय विरार येथे मोफत उद्योजकता परिचय मेळावा

बार्टी व एम सी ई डी मार्फत मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम
विवा महाविद्यालय विरार येथे मोफत उद्योजकता परिचय मेळावा

पालघर – प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विवा महाविद्यालय विरार यांच्या विशेष सहकार्याने एक महिना कालावधीचा डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओ शुटिंग आणि दोन महिने कालावधीचा अप्लाईड डेटा सायन्स अँनालिटिक्स हे दोन अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा की अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा या तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा.
सदर प्रशिक्षणात संबंधित विषयाचे प्रॅक्टिकल सह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे उद्योग उभारणी कशी करावी, शासकीय कर्जविषयक /अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा लायसन याविषयीची माहिती इत्यादी बाबींविषयी तज्ञ मार्गदर्शकाद्वारे प्रशिक्षण दिल्या जाईल, सदर प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे केली जाणार आहे. प्रत्यक्ष मुलाखत आणि या प्रोग्राम बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी विवा कॉलेज विरार येथे सकाळी ११.०० वाजता उद्योजकता परिचय मेळावा आयोजित केला आहे.

प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा १८ ते ४५ वयोगटातील असावा, तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, एक महिना कालावधीच्या ट्रेनिंगसाठी किमान १० वी पास आणि दोन महिने कालावधीसाठी किमान पदवीधर शिक्षण घेतलेले असावे, तो गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार / रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.
तरी इच्छुक आणि गरजूंनी दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता विवा कॉलेज विरार पूर्व येथे वरील कागदपत्रासह उपस्थित राहावे.
अधिक माहिती श्री.डी.सी. थोरात मो.नं. 9168667163 ,श्रीमती वैशाली ढेपे, मो.नं 99202 67328 व श्री.सचिन माळवे मो.न 8693014527 एम.सी.ई.डी. पालघर, श्रीमती स्नेहा मोरे , विवा कॉलेज, विरार मो. नं.9167540584 यांच्याशी संपर्क साधावा किंवा एमसीडीच्या वेबसाईट www.mced.co.in/Barti या link वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन श्री. डी.यू. थावरे, विभागीय अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मुंबई आणि श्री. विलास साबळे प्रकल्प अधिकारी, बार्टी पालघर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button