Uncategorized

तलासरी येथील कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा’ व ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात संपन्न

तलासरी येथील कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा’ व ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात संपन्न


​तलासरी (प्रतिनिधी):दि. १

विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षेचे नियम पाळून स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवावे आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, या उद्देशाने तलासरी येथील कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रस्ता सुरक्षा, युवा मार्गदर्शन आणि मराठी भाषा गौरव दिन अशा त्रिवेणी संगमातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

​कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक पालघर जिल्हा वाहतूक शाखेचे दुय्यम अधिकारी (PSI) संदीप नागरे यांनी उपस्थित युवकांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर माहिती दिली. सध्याच्या काळात तरुणांमध्ये वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी हेल्मेटचा वापर, परवाना (License) बाळगणे आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. “रस्त्यावर चालताना आपली एक चूक केवळ आपल्यासाठीच नाही, तर आपल्या कुटुंबासाठीही घातक ठरू शकते,” असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.याच कार्यक्रमात ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विषद केले. अत्यंत खुसखुशीत आणि विनोदी शैलीत संवाद साधत त्यांनी भाषेचा वापर कसा करावा आणि मराठी संस्कृती कशी जपावी, याचे दर्शन घडवले. त्यांच्या शैलीदार भाषणामुळे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या विविध पैलूंचा आनंद लुटला.​या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे केंद्रसंयोजक भास्कर गोतीस, सचिन जिवडे, शिवाजी सुरनर, विष्णू वळवी, पवार मॅडम, जिवडे मॅडम, तामोरे मॅडम आदी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन व प्रशासकीय मार्गदर्शन प्रा. भास्कर गोतीस यांनी केले.शिस्तबद्ध रस्ता सुरक्षा आणि भाषेवरील प्रेम या दोन्ही मूल्यांची शिदोरी घेऊन विद्यार्थी या कार्यक्रमातून बाहेर पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button