Uncategorized

आगरवाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने विज्ञान प्रदर्शन -खाद्य जत्रा नंतर रंगला खेळ पैठणीचा

आगरवाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने विज्ञान प्रदर्शन -खाद्य जत्रा नंतर रंगला खेळ पैठणीचा


२ मार्च
सफाळे ( एच लोखंंडे ) दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ, लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्टच्या इंग्रजी माध्यम शाळा आगरवाडी (सफाळे पश्चिम ) वा. ग. वर्तक शैक्षणिक संकुल येथे, राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘विज्ञान प्रदर्शन’, ‘खाद्य पदार्थ जत्रा’ आणि ‘खेळ पैठणीचा’ असे तीन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. चिंतामण ठाकूर सर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवत. विविध विज्ञान प्रयोग, ऐतिहासिक किल्ले, पृथ्वी सवर्धण, प्रदुषणांचे दुष्परिणाम, तसेच घरांचे विविध प्रकार, चित्रकला, शिल्पकला, हस्तकला नमुने आदी या प्रदर्शनात सादर करण्यात आलेले.
यानंतर लगेच खाद्य पदार्थ जत्रेचे उद्‌घाटन संस्थेचे संचालक श्री. भरत चौधरी सर यांच्या हस्ते करण्यात आलेले खाद्य पदार्थ जत्रेत विद‌यार्थ्यांनी स्वतःच्या घरून बनवून आणलेले, वेगवेगळे प्रदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आणले होते. ते विविध पदार्थ विकत घेताना ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून विद्यार्थ्यांंना समाधान वाटत होते. खाद्य जत्रा आयोजित करण्या मागचा उद्‌देश्य विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे व गणितातील आकडेमोड प्रत्यक्षा व्यवहारात यावी हाच मुख्य उद्देश होता.
दुपारी ठीक ४ वाजता ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम खास पालकासाठी आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.सौ. नियुक्ती शुभम पाटील या होत्या, तर निवेदिका सौ. लतिका पंकज पाटील मॅडम यांनी खेळ पैठणीसाठी वेगवेगळे खेळ घेऊन, आयोजकांनी या खेळात भाग घेतलेल्या स्पर्धाका पैकी १० विजयी स्पर्धक यांना पैठणीसाठी पात्र ठरविण्यात आलेले. ”खेळ पैठणीचा'” घेण्याचा मुख्य उद्देश महिला – पालकांना दैनंदिन जबाबदारीतून विरंगुळा देणे आणि महिला सक्षमीकरणाचा आनंद साजरा करणे हाच होता. महिला – पालक पैठणीसाठी खेळ खेळत असताना खूप आनंदाने खेळत होत्या. आणि स्पर्धेत पैठणी जिंकलेल्या महिलांचा आनंद गगणात मावत नव्हता. स्पर्धेतील विजेत्या महिलांना, या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विजयी महिलांन पैठणी बक्षिस देण्यात आल्या. अध्यक्ष श्री. पी. टी. पाटील सर महिलांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रुपाली भोईर मॅडम आणि त्यांच्या सहकारी शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button