चिचंणी परिसरात चार पाणपोई सुरू; उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा


चिचंणी परिसरात चार पाणपोई सुरू; उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा
पालघर (प्रतिनिधी) : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिचंणी परिसरातील नागरिकांसाठी पोलीस स्टेशन व श्री राम मंदिर महाआरती समूहाच्या वतीने चार ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे परिसरातील शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या पाणपोईंचे उद्घाटन डीवायएसपी विकास नाईक, वाणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तुषार पाचपुते, महाराज निवृत्ती जोशी, तसेच प्रसाद वझे, प्रदीप गायकवाड, श्याम मोदले, हर्षल ओझा, राकेश फुले, प्रकाश भाऊ, प्रतिक राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
गेल्या दोन वर्षांपासून महाराज निवृत्ती जोशी व प्रभारी पोलीस अधिकारी तुषार पाचपुते यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या पाणपोईंमुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत असून उन्हाळ्यातील उष्णतेपासून दिलासा मिळत आहे.
या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून पोलीस स्टेशन व श्री राम मंदिर महाआरती समूहाचे मनापासून आभार व्यक्त करण्यात येत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.