Uncategorized

१ एप्रिलपासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी.

१ एप्रिलपासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी.

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील )
पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करा – नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचे आवाहन.

बदलापूर : शहरात वाढत्या प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी १ एप्रिलपासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती देत कुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्ष सौ. रुचिता राजन घोरपडे यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणासह मूक प्राण्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा कचऱ्यातील अन्न खाताना जनावरे नकळत प्लॅस्टिकही खातात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अशा घटना वारंवार घडत असल्याने प्लॅस्टिक वापरावर नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

याशिवाय शहरातील नदी-नाले आणि गटारांमध्ये प्लॅस्टिक पिशव्या साचल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. परिणामी पावसाळ्यात पाणी साचणे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. तसेच डंपिंग ग्राऊंडमध्येही प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सौ. रुचिता घोरपडे यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून बदलापूरकरांना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

“पर्यावरणाचे संरक्षण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावेत,” असे आवाहन नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button