Uncategorized

पत्रकारितेतील निर्भीड आवाज हर्षद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

पत्रकारितेतील निर्भीड आवाज हर्षद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव
पालघर (प्रतिनिधी):
पत्रकारितेत नाविन्याची नवी दिशा दाखवत सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा आवाज निर्भीडपणे समाजासमोर मांडणारे ज्येष्ठ पत्रकार हर्षद पाटील यांचा वाढदिवस विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.
आपल्या विचारांनी, कार्यशैलीने आणि माणुसकीने अनेकांना प्रेरणा देणारे हर्षद पाटील हे सत्यासाठी झगडणारी लेखणी आणि अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका यासाठी ओळखले जातात. कठीण परिस्थितीतही धैर्य न सोडता पत्रकारितेचा धर्म जपत समाजहितासाठी काम करण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी आदर्श ठरली आहे.
वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, नवनवीन यश आणि समाजहिताचे कार्य करण्याची ऊर्जा सदैव लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा विविध स्तरांतून देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button