Uncategorized

मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन

मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन


पालघर :(प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी इनर व्हील क्लब ऑफ पालघर यांच्या वतीने मुलींमध्ये आत्मविश्वास व आत्मसंरक्षणाची भावना वाढवण्यासाठी कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ८६ मुलींनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धा वयोगट व बेल्टनुसार तीन गटांमध्ये पार पडली. कार्यक्रमासाठी श्री. सागर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रीती भोईर व हिरकणी ग्रुप यांनी “श्री शक्ती” या गाण्यावर सादर केलेल्या स्वागत नृत्याने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनर व्हील क्लबच्या सदस्या श्रीमती माधुरी राऊत यांनी केले. महिला दिनाचे औचित्य साधून इनर व्हील क्लबच्या सदस्यांचा तसेच हिरकणी ग्रुपचा सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा शिहान अजय मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेतील विजेत्या मुलींना गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ व कॉपर मेडल्स तसेच प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. याशिवाय प्रथमच ग्रँड चॅम्पियनशिपसाठी रोख बक्षिसे देण्यात आली.
यावेळी इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्षा ॲड. विनिता पाटील यांनी इनर व्हील संस्थेबद्दल माहिती देत महिलांसाठी सेल्फ डिफेन्सचे महत्त्व अधोरेखित केले. तर प्रमुख पाहुणे श्री. सागर पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इव्हेंट चेअरमन मनीषा करंजीकर व टूर्नामेंट ऑर्गनायझर शिहान अजय मिश्रा यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सर्व स्पर्धक तसेच उपस्थित अधिकारी व पाहुण्यांसाठी नाश्ता व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
हा उपक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडला असून या माध्यमातून महिला सशक्तीकरण व आत्मसंरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button