Uncategorized

यादव समाज सेवा संस्था, बोईसरतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात; ३५ महिलांचा गौरव

यादव समाज सेवा संस्था, बोईसरतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात; ३५ महिलांचा गौरव


बोईसर : प्रतिनिधी
यादव समाज सेवा संस्था, बोईसर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ सिडको कॉलनी, बोईसर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बोईसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मेहेर मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात यादव समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या एकूण ३५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, उद्योजकता तसेच शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलांनी आपल्या कार्यातून समाजात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मेहेर मॅडम यांच्या हस्ते सर्व महिलांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी मार्गदर्शन करताना मेहेर मॅडम यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महिलांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून समाजाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमामुळे समाजातील महिलांना प्रोत्साहन मिळाले असून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button