Uncategorized

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कौस्तुभ पुरस्काराने सन्मानित!शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्रत्येक युगाची आवश्यकता — निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कौस्तुभ पुरस्काराने सन्मानित!
शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्रत्येक युगाची आवश्यकता — निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

सांगली( मनोज तांबे)
समागमाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई यांच्या वतीने वर्ष २०२६ चा प्रतिष्ठित “कौस्तुभ पुरस्कार” सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री माननीय श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान केला गेला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक श्री.संजयजी भोकरे. सिद्धार्थ भोकरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे , प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव ,दैनिक समर्थ गावकरी महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर, सागर बोधगिरे , विश्वनाथ कोकणे व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राचा तीन दिवसीय ५९वा वार्षिक निरंकारी संत समागम २६ जानेवारी२०२६ रोजी सांगलीमध्ये भव्य रुपात यशस्वीरित्या संपन्न झाला. समागमाच्या समापन सत्रामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी लक्षावधी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सांगितले, की शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्राप्त करुन जीवनात प्रेम, दया आणि करूणेचा भाव अंगीकारणे ही प्रत्येक युगाची आवश्यकता राहिली आहे.
सतगुरु माताजी म्हणाल्या, की मानवाचा दृष्टिकोण बहुधा नकारात्मक होऊन जातो. त्यामुळे तो चांगुलपणामध्येही दोष शोधत राहतो. याउलट संतजन परमात्म्याच्या जाणीवेमध्ये जगून अंधारातही प्रकाश किरणाला आधार बनवतात. ब्रह्मज्ञानाद्वारे ते स्वत:चे जीवन उज्ज्वल करतातच, शिवाय समाजालाही प्रकाशमान करतात.
संतांच्या जीवनाचे वैशिष्ट्य समजावताना माताजी म्हणाल्या, की संतांचे जीवन दिखावा, कट-कारस्थानापासून मुक्त आणि सहज, सरळ व सकळांच्या कल्याणासाठी समर्पित असते. सतगुरु माताजींनी निरंकारी भक्तांना सत्संग, सेवा व सिमरणाच्या माध्यमातून आत्ममंथन करत सजग व सकारात्मक जीवन जगण्याचे आवाहन केले.
समागमाची क्षणचित्रे
कवि दरबार
समागमाच्या तिन्ही दिवशी “आत्ममंथन” या विषयावर कवि दरबाराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये देश-विदेशातील एकंदर २२ कवी व कवियित्रींनी मराठी, हिंदी, पंजाबी, हरियाणवी, भोजपुरी व इंग्रजी भाषांच्या माध्यमातून काव्य पाठ प्रस्तुत केला ज्याचा भरपूर आनंद श्रद्धाळु भक्तांनी प्राप्त केला.
“कौस्तुभ पुरस्कार” देऊन सन्मानित
समागमाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई यांच्या वतीने वर्ष २०२६ चा प्रतिष्ठित “कौस्तुभ पुरस्कार” सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री माननीय श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान केला गेला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक श्री.संजयजी भोकरे, श्री. सिद्धार्थ भोकरे,डॉ. श्री.विश्वासराव आरोटे (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव ,संजय फुल सुंदर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
निरंकारी मिशनच्या नूतन साहित्याचे प्रकाशनः
समागमाच्या पहिल्या दिवशी सत्संग कार्यक्रमा दरम्यान सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या करकमला द्वारे समागम विशेषांक “आत्ममंथन” आणि ‘गुरूदेव हरदेव’ या पुस्तकाची नूतन भाषांतर आवृत्ती तसेच अन्य पुस्तकांच्या भाषांतर आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या सर्व प्रकाशन सामग्री व मिशनच्या पत्र-पत्रिका समागम मध्ये लावलेल्या प्रकाशनाच्या ६ स्टॉल्सवर अत्यंत माफ़क दरात उपलब्ध आहेत ज्याचा लाभ श्रद्धाळू भक्तगण मोठ्या उत्साहाने घेत आहेत.
सेवादल रॅली
समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात एका आकर्षक सेवादल रॅलीने झाली ज्यामधेय महाराष्ट्रासह अन्य ठिकाणांहून आलेल्या हजारो सेवादल बंधु-भगिनी आपआपली खाकी-निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते. सतगुरू माताजी व निरंकारी राजपिताजींचे रॅलीमध्ये आगमन होताच मंडळाच्या सेवादल आधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन या दिव्य युगुलाचे सहर्ष स्वागत केले.
सेवादल रॅलीच्या प्रारंभी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या करकमलाद्वारे शांतीचे प्रतिक असणारा मिशनचा श्वेत ध्वज फ़डकवला. या रॅलीमध्ये बॅंण्डच्या सूरात पी.टी.परेड, संगीतमय योगा, मानव पिरॅमिड, मल्लखांब, एरोबिक, उम्ब्रेला फॉर्मेशन तसेच अनेक विविध खेळ प्रकार व साहसी कवायती प्रस्तुत केल्या.
त्याचबरोबर मिशनच्या शिकवणीवर आधारित विविध भाषांच्या माध्यमातून लघु नाटिका सादर करण्यात आल्या ज्याद्वारे भक्तीमधील सेवेचे महत्व अधोरेखित केले गेले तसेच अहंकार रहित होणे, सेवेमधील चेतनता व आदर भाव इत्यादी दिव्य गुण धारण करण्याची प्रेरणा देण्यात आली.
सेवादल व श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सतगुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी प्रतिपादन केले, की जीवनात निराकार परमात्म्याला प्राथमिकता देत समर्पित भावनेने सेवा करायची आहे. सेवा केवळ एक कार्य नसून ते पूर्ण मनोभावे श्रद्धा व सत्कार भावनेने करायची भावना आहे. सेवेच्या सोबत जीवनात सत्संगला महत्व देणे सुद्धा सेवेचेच एक रूप आहे. सेवेच्या मूळ भावनेला समजून केले गेलेले कार्यच जीवनामध्ये सुधार करते.
निरंकारी प्रदर्शनी
समागमात उभारलेली भव्य निरंकारी प्रदर्शनी श्रद्धाळूंच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या वर्षी सदर प्रदर्शनी ‘आत्ममंथन’ या विषयावर आधारित असून ज्यामध्ये आत्मचिंतन, आत्मबोध आणि मानवी मुल्यांचे महत्व अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने प्रस्तुत केले आहे.
ही प्रदर्शनी मुख्यतः तीन भागांमध्ये विभागली आहे. तिच्या मुख्य भागात मिशनचा इतिहास, विचारधारा तसेच देश-विदेशात केले जाणारे मानवतेसंबंधी निष्काम सेवा कार्यांचे प्रतिबिंब दर्शवले आहे. दुसऱ्या भागात “बाल-प्रदर्शनी” उभारली असून त्यामध्ये बालकांना उज्ज्वल जीवन जगण्याची प्रेरणा देणारे शिक्षाप्रद आकर्षक मॉडेल्स बनवले आहेत ज्याचा उल्लेख निरंकारी राजपिताजी यांनी आपल्या विचारांमध्येही केला. प्रदर्शनीच्या तिसऱ्या भागात मिशनची समाजकल्याण शाखा ‘संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन’च्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचा समावेश आहे.
लंगर व कॅंटीन व्यवस्था
समागमात येणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी दिवस-रात्र सामूहिक भोजनाची (लंगर) व्यवस्था मैदानाच्या तिन्ही भागांमध्ये केली आहे. एका लंगर स्थानावर एकाच वेळी जवळपास १०,००० श्रद्धाळू भोजन करू शकतात. या व्यतिरिक्त ४ कॅंटीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये अत्यल्प दरात चहा, कॉफी, शीत पेय व अल्प-उपहार उपलब्ध आहेत. मिनरल वॉटरची देखील उचित व्यवस्था याच कॅंन्टीनमध्ये करण्यात आली आहे.
स्वास्थ्य सेवा
समागम स्थळावर तीन डिस्पेंसरी, दोन प्राथमिक चिकित्सा केंद्र तसेच आईसीयू सुविधेसहित हॉस्पिटलची व्यवस्था केलेली होती. ॲलोपॅथी, आयुर्वेद व होमिओपॅथी पद्धतिने जवळ जवळ ५०,००० भाविकांना स्वास्थ सेवा प्रदान केल्या गेल्या. या व्यवस्थेमध्ये ५४ डॉक्टर्स व ३२६ चिकित्सा कर्मचारी कार्यरत होते. आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी ११ ॲम्ब्युलन्स तैनात होत्या.
कायरोप्रॅक्टिक चिकित्सा शिबिर
प्रशंसनीय आहे, की कायरोप्रॅक्टिक चिकित्सा शिबिरामध्ये विदेशातून २३ तर भारतातून २ विशेषज्ञांनी आपल्या निष्काम सेवा प्रदान केल्या. तीन दिवसांमध्ये जवळपास ३,००० भाविकांनी या चिकित्सेचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button