Uncategorized

एम.सी. ई. डी. मार्फत पालघरमध्ये फॉस्टॅक ट्रेनिंगचे आयोजनफूड सेक्टर मधील उद्योजक/भावी उद्योजक यांच्यासाठी सुवर्णसंधी

एम.सी. ई. डी. मार्फत पालघरमध्ये फॉस्टॅक ट्रेनिंगचे आयोजन
फूड सेक्टर मधील उद्योजक/भावी उद्योजक यांच्यासाठी सुवर्णसंधी

पालघर –प्रतिनिधी
उद्योग संचालनालय–महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) पालघर यांच्या वतीने फूड सेक्टरशी निगडीत अन्न सुरक्षाबाबत FoSTaC या महत्वपूर्ण एक दिवसीय ट्रेनिंगचे पालघर येथे येथे दि. १८ नोव्हेंबर २०२५ मंगळवर रोजी नियोजन केले आहे.

   सदरील ट्रेनिंगमध्ये,अन्न प्रकिया उद्योगातील विविध कायदेबाबत सखोल माहिती, अन्नाचे पॅकेजिंग आणि वितरण कसे करावे, अन्न संचालन आणि नियोजन, वर्तणूक आणि स्वच्छता,अन्न सुरक्षा आणि अन्न सुरक्षाबाबतचे धोके, अन्न प्रकिया उद्योगासाठी विविध कर्ज आणि अनुदान योजना इत्यादी बाबत फॉस्टॅक मान्यताप्राप्त खास ट्रेनर मार्फत सविस्तर मार्गदर्शन आणि माहिती देण्यात येणार आहे.

सदरील प्रशिक्षण दि.१८ नोव्हेंबर २०२५ मंगळावर रोजी सकाळी ११.३० ते ४.३० या वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), द्वारा – जिल्हा उद्योग केंद्र ,कक्ष क्र.१०३,पहिला मजला,प्रशासकीय इमारत ‘अ’, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर- बोईसर रोड, कोळगाव, पालघर येथे एम.सी.ई.डी.जिल्हा कार्यालय या ठिकाणी होणार आहे.
अन्न प्रकिया उद्योग करणारे किंवा इच्छुक असणाऱ्या सर्व उद्योजक–भावी उद्योजकांनी या ट्रेनिंगमध्ये नाव नोंदणीसाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत श्री.डी सी. थोरात– प्रकल्प अधिकारी, एम. सी. ई डी. पालघर मो.९१६८६६७१६३ किंवा सौ.पूर्वा दिवे–प्रशिक्षण समन्वयक एम. सी . इ.डी.पालघर मो. ८८०६८८१००९ यांना संपर्क करण्याचे आवाहन विभागीय अधिकारी एम.सी. ई.डी. मुंबई श्री.डी. यू. थावरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button