Uncategorized

कुरगाव गाव जिल्हा पालघर जिल्हा परिषद शाळेत बालदिन उत्साहात साजरा

कुरगाव गाव जिल्हा पालघर जिल्हा परिषद शाळेत बालदिन उत्साहात साजरा.


बोईसर (प्रतिनिधी) दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा कुरगाव येथे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ठिणगी सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता सुधीर माळवदे आणि संस्था सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बोईसर शहर अध्यक्ष श्री तेजस (जितु)पवार हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. ठिणगी सामाजिक सेवा संस्थेतर्फे विद्यालयाला विद्यार्थी उपयोगी 21 पुस्तके देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी दोन्ही पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंदाने शिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. माळवदे मॅडमनी स्वलिखित बालकवितांचे वाचन करुन विद्यार्थ्यांना आनंददायी उपक्रमात रमवून ठेवले. यावेळी विद्यालयाच्या प्रमुख शिक्षिका श्रीमती संजीला घरत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्टपणे करून आभार देखील मानले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुनीता रसाळ देखील उपस्थित होत्या. अशाप्रकारे कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button