आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चिपळूणच्या समाजसेविका अनिताताई नारकर ममता पुरस्काराने सन्मानित


आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चिपळूणच्या समाजसेविका अनिताताई नारकर ममता पुरस्काराने सन्मानित
१२ मार्च
पालघर ( एच लोखंंडे ) मुंबई महानगर टेलिफोन निगम कार्यकर्ते द्वारे स्थापन करण्यात आलेल्या ” जाणीव न्यास” या समाजसेवी संस्था मार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी मुंबई शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर व, याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात. समाजासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या नावे ‘ममता पुरस्कार’ मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योजीका श्रीमती कल्पना सरोज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सत्कार सोहोळ्याचे अध्यक्षपदी समाजसेवक आणि खासदार अरविंद सावंत व्यासपीठावर विराजमान होते.
श्रीमती अनिताताई नारकर या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मालघर या ग्रामीण भागामध्ये समाजातील निराधार, गरजू आणि दुर्बळ वृद्ध तसेच महिलांना मायेचा आधार देण्यासाठी स्थापन केलेल्या ‘आरती निराधार सेवा फाउंडेशन’च्या संस्थापिका आहेत.
या समारंभात पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महिलांचे कौतुक करताना उद्योजिका श्रीमती कल्पना सरोज यांनी आपल्या भाषणात, एकट्या महिलेमध्ये कार्य करण्याची शक्ती किती मोठी असते व कोणत्याही आपत्तीमध्ये विचलित न होता एकटी महिला यशाचा झेंडा कशी फडकावू शकते, हे स्वानुभवाची उदाहरणे देऊन सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन “जाणीव न्यास”‘ महानगर टेलिफोन निगम मधील समाजसेवी कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी केलेले.
सौजन्य बाळ पंडित