वाढदिवसानिमित्त पोलीस बांधवांचे दापचरी शाळेला अनोखे दान: ७१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्नेहभोजन



वाढदिवसानिमित्त पोलीस बांधवांचे दापचरी शाळेला अनोखे दान: ७१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्नेहभोजन
तलासरी दि. १३ (डॉ. दत्तात्रय शिंदे )
आपल्या कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत, गावातील दोन पोलीस सुपुत्रांनी जिल्हा परिषद घोरखनापाडा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करून एक आदर्श घालून दिला आहे.
दि. १२ रोजी शाळेतील विद्यार्थी आरव कृष्णा घोरखाना याचे वडील मा. श्री. कृष्णा घोरखाना (पोलीस साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विशेष उपक्रम राबवण्यात आला. “गावातील प्रत्येक मूल शिकलं पाहिजे आणि ते शाळेत टिकलं पाहिजे,” या उदात्त विचाराने त्यांनी इयत्ता १ ली ते ४ थी च्या ७१ विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप केले.
यापूर्वी नुकतेच दि.१० मार्च रोजी, विद्यार्थी वरुण राजू कुवरा याचे वडील श्री. राजू कुवरा (पोलीस साहेब) यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त
शाळेतील मुलांसाठी स्नेहभोजनाची सोय केली होती. त्यांनी सर्व मुलांसाठी चिकन रस्सा भाजीच्या जेवणाची मेजवानी दिली.शाळेची प्रगती व्हावी आणि मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने या दोन्ही पोलीस बांधवांनी केलेल्या मदतीबद्दल शाळेच्या वतीने लक्षी शेलार सर व दिलीप धांगडा सर यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.