गुढीपाडवा निमित्त विरारमध्ये २२व्या वर्षी भव्य शोभायात्रा; विविध स्पर्धांचे आयोजन



गुढीपाडवा निमित्त विरारमध्ये २२व्या वर्षी भव्य शोभायात्रा; विविध स्पर्धांचे आयोजन
विरार :(प्रतिनिधी )गुढीपाडव्याच्या मंगलमय उत्सवानिमित्त श्री विठ्ठलनाथ संस्थान, विरार (प.) यांच्या वतीने यंदाही भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २२ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा सांस्कृतिक उत्सव साजरा केला जाणार आहे.
या वर्षीच्या शोभायात्रेत नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध वयोगटांसाठी Reels Making, Poster Making, वेशभूषा स्पर्धा तसेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमुळे तरुणाईसह सर्व वयोगटातील नागरिकांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याची संधी मिळणार आहे.
विरार परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवात सहभाग नोंदवावा आणि गुढीपाडव्याचा हा सांस्कृतिक सोहळा अधिक भव्य व उत्साहपूर्ण करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.