Uncategorized
स्काऊट गाईड अंतर्गत झरी शाळेचा शिलोंडा येथे समाजसेवा कॅम्प संपन्न

स्काऊट गाईड अंतर्गत झरी शाळेचा शिलोंडा येथे समाजसेवा कॅम्प संपन्न
तलासरी दि. २७(डॉ. दत्तात्रय शिंदे )
ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय, झरी शाळेतील स्काऊट गाईडचा कॅम्प आदिवासी विकास केंद्र, शिलोंडा येथे दि. २५ रोजी मुलांनी समाजसेवा व प्रत्यक्ष मेहनतीचा अनुभव घेत आनंदात दिवस घालवला.
आपत्कालीन परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.मुलांनी तंबू बनवून व प्रत्यक्ष स्वयंपाक बनवून एकत्र जेवण केले.तद्नंतर स्वच्छता करून मात्रृछाया समाजसेवी संघटनेअंतर्गत ‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर सत्र घेण्यात आले.
शाळेच्या प्राचार्या सि.बस्तियान फर्नांडिस व स्काऊट गाईड चे मार्गदर्शक शिक्षक सौ. हेमलता तांडेल मॅडम व अमित सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी कॅम्प संपन्न झाला.