आटपाडीच्या सुप्रियांच्या कवितेला अ. भा. साहित्य संमेलनात स्थान !



आटपाडीच्या सुप्रियांच्या कवितेला अ. भा. साहित्य संमेलनात स्थान !
__________
आटपाडी दि . २४ ( प्रतिनिधी )
सातारा येथे १ जानेवारी पासून संपन्न होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, आटपाडी तालुक्यातल्या नवोदित कवयित्री डॉ . सुप्रिया साळुंखे – कदम यांच्या कविता सादरीकरणाला संधी मिळाली असून त्याबद्दल डॉ . सुप्रिया यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
आटपाडी तालुक्याशी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या ५ दिग्गज साहित्यीकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवून आटपाडी तालुक्याला मोठा सन्मान मिळवून दिला होता . त्या साहित्यीक पार्श्वभूमी वर कदम यांना कविता सादरीकरणास संधी मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे .
आटपाडी येथील कवयित्री डॉ. सुप्रिया कदम – साळुंखे यांची सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात काव्य वाचनासाठी कवी कट्ट्यावर निवड झाली आहे. या मानाच्या साहित्यिक व्यासपीठावर काव्य सादरीकरणाची संधी मिळणे ही आटपाडी शहरासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
यापुर्वीही आटपाडी तालुक्यातील अनेकांना कविता सादरीकरणास संधी मिळाली आहे . डॉ. सुप्रिया कदम – साळुंखे यांच्या निवडीबद्दल आटपाडी शहरातील साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कवितांमधून सामाजिक वास्तव, संवेदनशीलता आणि मानवी भाव भावनांचा प्रत्यय येतो, हे त्यांच्या साहित्यिक प्रवासाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. सुप्रिया साळुंखे – कदम या व्याख्याता, कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही परिचित आहेत. त्या आटपाडी येथील विजयमंगल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक येथे सेवा देत असून वैद्यकीय सेवे सोबतच सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातही सातत्याने योगदान देत आहेत.
त्यांची ही साहित्यिक कामगिरी आटपाडीच्या सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेला नवी ओळख देणारी ठरत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आटपाडीत व्हावे . आणि मागच्या ४ दशकापासून साहित्य विश्वास सक्रिय असणारे आटपाडी तालुक्यातील आणखी काही जण भविष्यात अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत . अशी प्रांजळ अपेक्षा हजारो माणदेशी आणि आटपाडी तालुका वाशीयांची सदैव राहीली आहे . त्यादृष्टीने आटपाडी तालुका वाशीय साहित्यीकांची भविष्यात साहित्यीक विश्वात दमदार पावले पडतील . अशी अपेक्षा शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी डॉ . सुप्रिया साळूंखे – कदम यांचे अभिनंदन करून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली आहे .