साई ग्रुप चालक-मालक संघ, गव्हाणपाडा रिक्षा स्टॅन्ड पुजा, एकविरा पालखी अंजुर दिवे, आगरी समाज सेवा संघ (खाडा) प्रभादेवी, नवी मुंबई मानाची पालखी

साई ग्रुप चालक-मालक संघ, गव्हाणपाडा रिक्षा स्टॅन्ड पुजा, एकविरा पालखी अंजुर दिवे, आगरी समाज सेवा संघ (खाडा) प्रभादेवी, नवी मुंबई मानाची पालखी
मुंबई प्रतिनिधी: (सतीश पाटील)
पालखीसह पदयात्रा सोहळा समिती
हे मंडळ सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या वतीने रक्तदान अन्नदान वाटप वह्या वाटप आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम राबवत असतात तसेच पाणपोई व मोफत वाचनालय देखील आहे दरवर्षी नवरात्री उत्सव तसेच 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान मोफत मुलुंड ते शिर्डी साई पालखी निघते साई पदयात्रा कडून कोणतीही प्रवेश फी घेत नाही त्यांना मोफत प्रवेश करून दिला जातो.
दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी साई पालखी निमित्त भंडारा व पूजेचे आयोजन करण्यात येते. स्थानिक व पालखी पदयात्री साई भजनाचा भक्ती मय भजनाचा कार्यक्रम करतात.अनेक मान्यवर दर्शनाचा लाभ घेतात तसेच प्रत्येकाचा सन्मान करण्यात येतो. मुंबई पत्रकार श्री सतीश पाटील यांना साईबाबा फोटोचे मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ पालखी प्रमुख : श्री.संजय खामकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गव्हाणपाडा रिक्षा स्टॅन्ड , मुलुंड पुर्व, आयोजित सत्यनारायणाची महापूजा मनोभावे दर्शन श्री सतीश पाटील व सुनील करंजेकर तसेच मित्र मंडळ सह दर्शन घेतले.एकविराआई पालखीनिमित्त पुजा महाप्रसाद भंडारा दिवे अंजुर (भिवंडी ) मनोभावे दर्शन व पालखीप्रमुख श्री.रविंद्र भोईर यांच्या हस्ते एकविरा देवीच्या प्रतिमा फोटो देऊन पत्रकार सतिश पाटील, माजी शिवसेना शाखाप्रमुख बाबा भगत यांचा सत्कार करण्यात आला. आगरी समाज सेवा संघ दादर( प्रभादेवी खाडा ) अध्यक्ष मा. श्री. प. सा. म्हात्रे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे पत्रकार सतिश पाटील व गायक, कवी दया नाईक यांचा मानचिन्ह, शाल, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.नवीमुंबई मानाची पालखी पालखीला खांदा देण्याचा मान व सत्कार सतिश पाटील यांचा अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या हस्ते पनवेल येथे करण्यात आला.