पालघर जिल्ह्यात संतोष जाधव गुरुजी यांच्या नव्या घराचे उत्साहात उद्घाटन

पालघर जिल्ह्यात संतोष जाधव गुरुजी यांच्या नव्या घराचे उत्साहात उद्घाटन

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील जेष्ठ बौद्ध आचार्य, समता सैनिक दलाचे कमांडर तसेच विविध धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे संतोष जाधव गुरुजी यांच्या नव्या घराच्या वास्तु उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) चे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव सोमनाथ धनगवकर, दिपेश गायकवाड, श्यामराव खरात यांच्यासह जिल्ह्यातील अनेक बौद्ध आचार्य, रमाई गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी संतोष जाधव गुरुजी व त्यांच्या कुटुंबियांना नव्या घरासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात उपस्थितांनी मंगलमय वातावरणात शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमात आनंदी वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.