विराज प्रोफाइल्स प्रा. लि. प्रकल्प विस्तारासाठी ८ एप्रिल रोजी सार्वजनिक सुनावणी
विराज प्रोफाइल्स प्रा. लि. प्रकल्प विस्तारासाठी ८ एप्रिल रोजी सार्वजनिक सुनावणी
पालघर (प्रतिनिधी)
विराज प्रोफाइल्स प्रा. लि. यांनी हॉट रोल्ड स्टेनलेस स्टील HRAP/CRAP शीट्स, प्लेट्स व कॉइल्स उत्पादनाच्या नियमितीकरण व विस्तारासाठी मौजे मान तसेच मौजे वरांगडे, ता. व जि. पालघर येथे प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्या वतीने सार्वजनिक सुनावणीचे आयोजन करण्यात आले असून ही सुनावणी दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, एसआरएम प्लांट, मौजे मान येथे पार पडणार आहे.
विराज प्रोफाइल्स प्रा. लि. ही कंपनी स्वच्छ, शाश्वत व सातत्याने सुधारत जाणाऱ्या पर्यावरणीय कामगिरीसाठी कटिबद्ध असून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर कंपनीचा भर आहे. मागील ३० वर्षांपासून बोईसर परिसराच्या औद्योगिक व आर्थिक विकासात कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. सध्या सुमारे १३,००० कर्मचारी विराजसोबत कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
प्रस्तावित प्रकल्पामुळे ५,००० हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना प्राधान्य देत आर्थिक विकासाला चालना देण्याचा कंपनीचा मानस आहे.
कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि समाजविकास या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये –
ग्रामीण भागात आरोग्य व स्वच्छतेसाठी वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका सेवा
महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण व आर्थिक मदत
जिल्हा परिषद शाळांचे उन्नतीकरण व डिजिटल सुविधा
पिण्याचे पाणी, सौर दिवे व रस्ते विकास
युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रे
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
पर्यावरण संवर्धनासाठी ‘near zero’ व ‘net zero’ उद्दिष्ट
अशा सात प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येत आहे.
विराज प्रोफाइल्स प्रा. लि. तर्फे स्थानिक नागरिक, ग्रामस्थ व माध्यम प्रतिनिधींना सार्वजनिक सुनावणीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “आपण सर्वजण विराज कुटुंबाचा एक भाग आहोत. त्यामुळे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे कंपनीकडून आवाहन करण्यात आले आहे.