दांडेकर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी बस स्टॉपचे उद्घाटन

दांडेकर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी बस स्टॉपचे उद्घाटन
पालघर,(प्रतिनिधी )दि. ६ मार्च : Rotary Club of Palghar यांच्या वतीने तसेच Sarita & Suresh Bhupal Bahirsheth Trust यांच्या प्रायोजकत्वाखाली Dandekar College Palghar येथे विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या बस स्टॉपचे उद्घाटन आज शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी करण्यात आले.
विद्यार्थ्यांना उन्हात व पावसात उभे राहावे लागू नये तसेच त्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दांडेकर कॉलेजमध्ये दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. नव्याने उभारण्यात आलेल्या या बस स्टॉपमुळे अंदाजे १५ हजार विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर पद्धतीने बसची प्रतीक्षा करता येणार असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या प्रसंगी दांडेकर कॉलेज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सी. ए. सचिन कोरे, प्राचार्य किरण सावे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनंत पाटील, तसेच सरिता & सुरेश भूपाल बहिरशेठ ट्रस्टचे जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी सागर गिरीधर पाटील, रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष संजय महाजन, सेक्रेटरी मनीष पिंपळे, फर्स्ट लेडी शैला महाजन, भगवान पाटील, निनाद सावे, Rotary Club of Umroli चे अध्यक्ष सागर घरत, पालघर नगरपरिषदेचे नगरसेवक व रोटरी क्लब ऑफ पालघरचे माजी अध्यक्ष जयेश आव्हाड, मेडिकल डायरेक्टर कल्पेश पाटील तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ पालघर आणि सरिता & सुरेश भूपाल बहिरशेठ ट्रस्ट यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. समाजासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवून सकारात्मक बदल घडवण्याचा रोटरी क्लबचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.