Uncategorized

श्री अंबेमाता मंदिर के.रोड १७ वा वर्धापनदिन सोहळा

श्री अंबेमाता मंदिर के.रोड १७ वा वर्धापनदिन सोहळा*

१० नोव्हेंबर 

सफाळे ( एच लोखंंडे ) सालाबादप्रमाणे यावर्षी हि दिनांक ११नोव्हेंबर २०२५ रोजी  श्री अंबामाता मंदिर केळवा रोड पश्चिम ता.जि.पालघर येथे  श्री अंबेमाता मंदिर व उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी, एकता चॅरिटेबल ट्रस्ट Northen vare Superspellity Hospital Dahisar ( E ) मुंबई यांच्या सहयोगाने, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत कार्डिक आरोग्य शिबीर ) मोफत तपासणी / ऑपरेशन आयोजित केले आहे.

       तसेच दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी वर्धापनदिनानिमित्त सकाळ ते रात्री पर्यंत सालाबादप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळ पासून मंदिरातील सर्व मुर्तीचा अभिषेक व पुजा, आरती व तिर्थप्रसाद, होमहवन, दुपारी ४ नंतर होम पुर्णाहुती, संध्याकाळी आरती प्रसाद, रात्री महाप्रसाद (भंडारा ) नंतर स्थानिक कलाकार मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

   पंचक्रोशीतील सर्व भक्तांनची, गावकरी यांची उपस्थिती दर्शवावी असे जाहीर आमंत्रण आयोजक यांच्या मार्फत करण्यात आले आहे. स्वईच्छेने दिलेली वर्गणी/ देणगी स्विकारली जाईल, मंदिर ट्रस्ट.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button